काँग्रेसला टेकू गांधी घराण्याचाच

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये आणि प्रदेशनिहाय सल्लामसलतीनंतर सहमतीने सोनियांकडे हंगामी नेतृत्व सोपविण्याचा निर्णय झाला.   काँग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. अधीररंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले.  राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्षपद नसले तर सक्रिय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रिय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले.  सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. अर्थात, सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी मात्र सहभागी झाल्या होत्या. अन्य नेत्यांना खुलेपणाने नव्या नेतृत्त्वाबाबत मतप्रदर्शन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनियांनी सांगितले. उपस्थित सर्व सरचिटणीस, प्रभारी तसेच सचिव यांची प्रदेशनिहाय पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. डॉ. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, तरुण गोगोई, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखालील गटांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील नेत्यांनी खर्गे यांना आपले म्हणणे कळवले. हे अभिप्राय ऐकून घेतल्यानंतर पाचही गट प्रमुखांनी आपापले अहवाल तयार केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील दुसऱ्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांच्या संमतीनंतर नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  रात्री पावणे अकराच्या सुमारास बैठक संपल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल यांचे आभारही मानले.  राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला कणखर नेतृत्व दिले. पक्षाला नवी दिशा दिली. त्यांनी चांगल्या पद्धतीने पक्षाची धुरा सांभाळली. अध्यक्षपदावर नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते कायम उपलब्ध असतील आणि  जनतेच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील. - रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते News Item ID: 599-news_story-1565458520Mobile Device Headline: काँग्रेसला टेकू गांधी घराण्याचाचAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये आणि प्रदेशनिहाय सल्लामसलतीनंतर सहमतीने सोनियांकडे हंगामी नेतृत्व सोपविण्याचा निर्णय झाला.   काँग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. अधीररंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले.  राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्षपद नसले तर सक्रिय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रिय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले.  सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. अर्थात, सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी मात्र सहभागी झाल्या होत्या. अन्य नेत्यांना खुलेपणाने नव्या नेतृत्त्वाबाबत मतप्रदर्शन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनियांनी सांगितले. उपस्थित सर्व सरचिटणीस, प्रभारी तसेच सचिव यांची प्रदेशनिहाय पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. डॉ. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, तरुण गोगोई, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखालील गटांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील नेत्यांनी खर्गे यांना आपले म्हणणे कळवले. हे अभिप्राय ऐकून घेतल्यानंतर पाचही गट प्रमुखांनी आपापले अहवाल तयार केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील दुसऱ्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांच्या संमतीनंतर नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  रात्री पावणे अकराच्या सुमारास बैठक संपल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल यांचे आभारही मानले.  राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला कणखर नेतृत्व दिले. पक्षाला नवी दिशा दिली. त्यांनी चांगल्या पद्धतीने पक्षाची धुरा सांभाळली. अध्यक्षपदावर नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते कायम उपलब्ध असतील आणि  जनतेच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील. - रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते Vertical Image: English Headline: Rahul Gandhi had said no G

काँग्रेसला टेकू गांधी घराण्याचाच

नवी दिल्ली : राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती. बाकी नावे मागे पडली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या दोन बैठकांमध्ये आणि प्रदेशनिहाय सल्लामसलतीनंतर सहमतीने सोनियांकडे हंगामी नेतृत्व सोपविण्याचा निर्णय झाला.  

काँग्रेस मुख्यालयात सकाळी अकराच्या सुमारास सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीच्या बैठकीस सुरवात झाली. बैठकीत राहुल यांनी राजीनामा मागे घेण्याचा पक्ष नेत्यांचा आग्रह नाकारला. अधीररंजन चौधरी, के. एच. मुनियप्पा यांनी हात जोडून राहुल गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली, तर सल्लामसलतीअंती तुमचेच नाव अध्यक्षपदासाठी आले तर काय कराल, या पी. चिदंबरम यांच्या सवालावर राहुल गांधींनी बोलण्याचे टाळले. 

राहुल गांधींनी सर्वांचे आभार मानताना, अध्यक्षपद नसले तर सक्रिय राहणार नाही असे समजू नये. उलट आपण अधिक सक्रिय राहू, असे स्पष्ट केल्यानंतर अखेर नव्या नावावर पक्ष नेत्यांचे अभिप्राय जाणून घेण्याचे ठरले. 

सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी मात्र या प्रक्रियेत सहभागी होण्याचे टाळले. अर्थात, सरचिटणीस असलेल्या प्रियांका गांधी मात्र सहभागी झाल्या होत्या. अन्य नेत्यांना खुलेपणाने नव्या नेतृत्त्वाबाबत मतप्रदर्शन करता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे सोनियांनी सांगितले. उपस्थित सर्व सरचिटणीस, प्रभारी तसेच सचिव यांची प्रदेशनिहाय पाच गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. डॉ. मनमोहनसिंग, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, तरुण गोगोई, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्त्वाखालील गटांनी सर्व नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील नेत्यांनी खर्गे यांना आपले म्हणणे कळवले. हे अभिप्राय ऐकून घेतल्यानंतर पाचही गट प्रमुखांनी आपापले अहवाल तयार केले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पुन्हा कार्यकारिणीची बैठक झाली. या वेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे देखील दुसऱ्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांच्या संमतीनंतर नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. 
रात्री पावणे अकराच्या सुमारास बैठक संपल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांनी राहुल यांचे आभारही मानले. 

राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाला कणखर नेतृत्व दिले. पक्षाला नवी दिशा दिली. त्यांनी चांगल्या पद्धतीने पक्षाची धुरा सांभाळली. अध्यक्षपदावर नसले तरी काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ते कायम उपलब्ध असतील आणि  जनतेच्या प्रश्‍नावर आवाज उठवतील. 
- रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

News Item ID: 
599-news_story-1565458520
Mobile Device Headline: 
काँग्रेसला टेकू गांधी घराण्याचाच
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Rahul Gandhi had said no Gandhi but Congress goes back to Sonia Gandhi
Author Type: 
External Author
पीटीआय
Search Functional Tags: 
सोनिया गांधी, राहुल गांधी, Rahul Gandhi, काँग्रेस, Indian National Congress, मनमोहनसिंग, पी. चिदंबरम, P Chdambaram, मल्लिकार्जुन खर्गे, Mallikarjun Kharge
Twitter Publish: 
Meta Description: 
राजीनामा मागे घेण्याचा काँग्रेस कार्यकारिणीचा वारंवार झालेला आग्रह राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा धुडकावून लावल्यानंतर अखेर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली. दिवसभरातील चर्चेत सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी यांचीच नावे चर्चेत होती.
Send as Notification: