विमानास पक्ष्यांची धडक; इंजिने बंद, विमान मक्याच्या शेतात उतरवले, 233 सुखरूप!

मॉस्को - एअरबस ए-३२१ विमानाने उड्डाण घेताच पक्ष्यांचा एक थवा विमानाला धडकला. त्यामुळे विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. दुसरे इंजिनही निकामी झाले. विमान खाली कोसळणार एवढ्यात वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून विमानाला मक्याच्या एका शेतात उतरवले. त्यात २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले, परंतु ७ कर्मचाऱ्यांसह २३३ जणांचे प्राण वाचले. हे काही सेकंदांतच घडून आले. माझा हा दुसरा जन्म आहे, अशी प्रतिक्रिया बचावलेल्या एका महिलेने दिली. विमान युराल एअरलाइन्सचे होते. ते मॉस्को ते क्रिमियाचा ताबा असलेल्या सिम्फरोपोलच्या दिशेने जात होते.वैमानिकास हीरोचा दर्जा देऊन गौरव करणारविमानाला धावपट्टीपासून एक किमी अंतरावरील शेतात उतरवणारा वैमानिक दमिर युसुपोव्ह यास हीरोचा दर्जा देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. दमिरसोबत असलेला सहकारी वैमानिक जॉर्ज मर्जिनलादेखील सन्मानित केले जाणार आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Ural Airlines plane makes emergency landing


 विमानास पक्ष्यांची धडक; इंजिने बंद, विमान मक्याच्या शेतात उतरवले, 233 सुखरूप!

मॉस्को - एअरबस ए-३२१ विमानाने उड्डाण घेताच पक्ष्यांचा एक थवा विमानाला धडकला. त्यामुळे विमानाच्या इंजिनाने पेट घेतला. दुसरे इंजिनही निकामी झाले. विमान खाली कोसळणार एवढ्यात वैमानिकाने प्रसंगावधान दाखवून विमानाला मक्याच्या एका शेतात उतरवले. त्यात २३ प्रवासी किरकोळ जखमी झाले, परंतु ७ कर्मचाऱ्यांसह २३३ जणांचे प्राण वाचले. हे काही सेकंदांतच घडून आले. माझा हा दुसरा जन्म आहे, अशी प्रतिक्रिया बचावलेल्या एका महिलेने दिली. विमान युराल एअरलाइन्सचे होते. ते मॉस्को ते क्रिमियाचा ताबा असलेल्या सिम्फरोपोलच्या दिशेने जात होते.


वैमानिकास हीरोचा दर्जा देऊन गौरव करणार
विमानाला धावपट्टीपासून एक किमी अंतरावरील शेतात उतरवणारा वैमानिक दमिर युसुपोव्ह यास हीरोचा दर्जा देऊन त्याचा गौरव केला जाणार आहे. दमिरसोबत असलेला सहकारी वैमानिक जॉर्ज मर्जिनलादेखील सन्मानित केले जाणार आहे.Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Ural Airlines plane makes emergency landing