... अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील - पंजाबराव पाटील

सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दुधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने 23 डिसेंबर पर्यंत निर्णय जाहीर करावा. अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील.

... अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील  - पंजाबराव पाटील

... अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील

पंजाबराव पाटील : शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा देण्याची मागणी  

कराड/प्रतिनिधी :

      सरकारने शेती पंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दुधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने 23 डिसेंबर पर्यंत निर्णय जाहीर करावा. अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.

      बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी २० रोजी त्यांनीनी माध्यमांशी संवाद साधला. 

शेती पंपाचे वीज बिल ऊस बिलातून कापल्यास आंदोलन

महाविरणने शेती पंपाचे वीज बिल ऊस बिलातून कापून घेण्याबाबत सांगितले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनीही शेती पंपाचे वीज बिल ऊस बिलातून कट करून घ्या, असे वक्तव्य केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून असे झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल.

- पंजाबराव पाटील