आध्यात्मिक ध्यान साधना शिबिराचा कराडकरांना लाभ

आध्यात्मिक ध्यान साधना शिबिराचा कराडकरांना लाभ

कराड/प्रतिनिधी :

                        आत्मध्यानाने मानवाला आत्मसुख मिळते.चित्ताचे शुध्दीकरन करण्यासाठी ध्यान आवश्यक आहे. एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच अभामंडल निर्माण करण्यास आत्मध्यानाची आवश्यकता आज समाजाला असल्याचे मत शिवकृपानंद स्वामींनी व्यक्त केले. 

                       येथील कृष्णा कॅंम्पसमधील बॅडमिंटन हाॅल येथे योगप्रभा भारती सेवा संस्थेचा समर्पन मेडीटेशन (ध्यान साधना) शिबिरास नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आशिष कालावार , डाॅ.प्रविण लिंबानी , एम्मा डोलमन (लंडन) डाॅ. बिनित्या राबे (जर्मनी)  यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ते बोलत होते. 

                       शिवकृपानंद स्वामी म्हणाले, मानवजातीच्या कल्याणासाठी आत्मध्यान करण्यासाठी योग प्रभाभारती सेवासंस्थेच्या जगभरातील 22 देशामध्ये याच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत. याची गरज आज समाजातील प्रत्येक घटकाला असुन आत्मध्यानाने एकाग्रता वाढण्यासह शरीराचा सर्वांगीन विकास होतो. चित्त शुध्दी होण्यासाठी प्रत्येकाने ध्यान करणे आवश्यक आहे. ध्यानाच्या बाबतीत स्वावलंबी होऊन ध्यान साधना करावी. शरीर हेच देवाचे मंदिर आहे. त्यामध्ये असणारा आत्मा हाच परमेश्वर असुन त्याच्या प्राप्तीसाठी मंदिरामध्ये जाण्यापेक्षा स्वतामध्ये त्याला पहावा, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला. 

                     ते पुढे म्हणाले, आत्मसुख मिळवण्यासाठी आध्यत्मिक जिवंत सदगुरुशी जोडले गेलो पाहिजे. निस्वार्थी मनाने त्याची साधना केल्यास आत्म्यास आनंदप्राती होते. आत्मा सशक्त करण्यासाठी चांगली कर्मे आवश्यक आहेत. आत्मध्यानासाठी कोणत्याही जातीची बंधने नसुन कोणताही मनुष्य याची साधना करुन आत्मशांती प्राप्त करु शकतो. वाढत्या धकाधकीच्या जीवनामध्ये आत्मध्यान काळाची गरज असल्याचे मत स्वामी शिवकृपानंद यांनी व्यक्त केले. यावेळी कराड शहरासह परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच देशविदेशातील काही नागरिकांनीही या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती.