आगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा

आगाशिव डोंगराला मंगळवारी सायंकाळी वनवा लागल्याची घटना घडली. परंतु, अचानक आलेल्या वादळी पावसाच्या जलधारा या वणव्यावर कोसळल्याने सदर वणवा विझला. वणवा भडकण्याआधी निसर्गानेच त्यावर मात केल्याचे दिसून आले.

आगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा
जखिणवाडी : जखिनवाडी ता. कराड गावाच्या बाजूने आगाशिव डोंगराला लागलेला वणवा.

आगाशिवावरील वणव्यावर कोसळल्या जलधारा 

कराड/प्रतिनिधी : 
          कराडनजीकच्या ऐतिहासिक व पौराणिक महात्म्य असलेल्या आगाशिव डोंगराला वनवा लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. परंतु, विघ्न संतोषींनी लावलेल्या या वणव्यावर निसर्गानेच मात केली असून पावसाच्या जलधारांनी हा वणवा विझवला आहे. 
           जखिणवाडी ता. कराडच्या बाजुने आगाशिव डोंगराला आग लागल्याची घटना मंगळवारी 27 रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या घडली. त्यानंतर स्थानिकांसह जखिणवाडी मलकापूरचे पोलीस पाटील, वनविभाग व निसर्गप्रेमींकडून सदर आग विझवण्यासाठी काय करता येईल, याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान, कराडसह परिसरात वादळी पावसाला सुरवात झाल्याने पावसाच्या सरींनी सदर आग विझवण्यास मदत केली. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

आगाशिव डोंगराला लागलेला वणवा खूप मोठा होता. परंतु, वेळीच वादळी पाऊस आल्याने वणवा शांत झाला आहे. तसेच, तीव्र उन्हाळ्यात कोसळलेल्या  पावसामुळे आगशिवगड व परिसरात निसर्ग ग्रुपने लावलेल्या सर्व झाडांना मोठा दिलासा दिला आहे. 

- दीपक रायबागी (सदस्य, निसर्ग ग्रुप कराड)