आरक्षण उपकार नव्हे विकासाचे साधन - डॉ. प्रकाश आंबेडकर

आरक्षण उपकार नव्हे विकासाचे साधन - डॉ. प्रकाश आंबेडकर

कराड/प्रतिनिधी : 

                        आरएसएस, बीजेपी, शिवसेना आरक्षणाच्या विरोधातील पक्ष आहेत. तसेच आरएसएस व बीजेपीने संविधानाच्याही विरोधात लढाई सुरू आहे. ओबीसी समाजाचे आरक्षण संपले पाहिजे, हे मोहन भागवत यांच्या पोटातील विष बाहेर आले आहे. परंतु, विवीध कर प्रणालीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत निधी जमा होतो. त्यातून अनुदान दिले जाते. सोने, हिरे व्यापाऱ्यांनाही हे अनुदान मिळते. मात्र, हल्ली ओबीसी समाजाला आरक्षण कमीपणाचे वाटते. परंतु, आरक्षण उपकार नव्हे; तर विकास करण्याचे साधन असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 
                     येथील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन येथे मंगळवारी 10 रोजी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने आयोजित सत्ता संपादन मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, भारिपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, संघटक बाळकृष्ण देसाई, महेशकुमार कचरे, भालचंद्र माळी, सचिन करांडे, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत आदी. उपस्थित होते.