अचलेरमध्ये  पत्नीचा खून तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

लोहारा तालुक्यातील अचलेर गाव हे अलीकडे कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेत राहत आहे. अचलेर गावात श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या रस्त्यावर असलेल्या वस्तीत नवरा व बायको असे दोघेही विचित्र  अवस्थेत मरण पावल्याचे आढळून आले. असले तरी या दोघांचे खून झाले  असावेत अशी  शक्यता वर्तवली जात आहे . तर पत्नीचा खून तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशीही चर्चा सुरू आहे.     

अचलेरमध्ये  पत्नीचा खून तर पतीची गळफास घेऊन आत्महत्या

 

गंभीर घटनेमुळे  अचलेर गावांत प्रचंड खळबळ           

 सोलापूर /महेश गायकवाड 

         लोहारा तालुक्यातील अचलेर गाव हे अलीकडे कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमीच चर्चेत राहत आहे. अचलेर गावात श्री मल्लिकार्जुन देवालयाच्या रस्त्यावर असलेल्या वस्तीत नवरा व बायको असे दोघेही विचित्र  अवस्थेत मरण पावल्याचे आढळून आले. असले तरी या दोघांचे खून झाले  असावेत अशी  शक्यता वर्तवली जात आहे . तर पत्नीचा खून तीने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी अशीही चर्चा सुरू आहे.                                                                      ही घटना काल सकाळी उशिरा उघडकीस आली असून घटनास्थळी मुरूम पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यु. व्ही. वारकर; उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार  हे तातडीने दाखल झाले असून ते वेगवेगळ्या अंगल ने तपास करत आहेत. मरण पावलेले दोघेही तरुण असून त्यांना तीन लहान मुले आहेत. दोघांचे ही खून झाले आहेत की त्यांनी स्वतः आत्महत्या केली आहे हे पोस्टमार्टेम अहवालात कळून येईल असे पोलीसांचे म्हणणे आहे. दत्तूसिंग राजेंद्रठाकूर वय-  ३५वर्षे तर संगीता ठाकूर वय- ३२ वर्षे असे मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांचे ही मृतदेह वेगळ्या आणि विचित्र अवस्थेत आढळून आल्या मुळे त्यांच्या मृत्यू बाबत अनेक तर्क वितर्क काढले जात असले तरी संगीता ठाकूर यांचा खून करून नंतर तिचा पती दत्तूसिंग याने घरातच गळफास घेतल्याची चर्चा गावांत सुरू होती. दरम्यान  मुरूम पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून घटनास्थळी जे मिळाले आहे त्या दृष्टीने तपास सुरू केला असून ही घटना कोणत्या कारणावरून झाली आहे. याचा शोध घेत असले तरी या बाबतीत गावकऱ्यांत मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. अगोदर पत्नी चा खून करून नंतर दत्तूसिंग याने गळफास घेतला असावा असाही कयास बांधला जात आहे.                                                                                                  दरम्यान अचलेर हे गाव या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत राहत आहे. येथे वारंवार कोणत्या ना कोणत्या घटना घडत असून गावाची मात्र तालुक्यात बदनामी होत आहे. काही वर्षांपूर्वी गावात च एका प्रतिष्टीत व्यक्तीचा खून झाला होता. या खुनात गावांतील राजकारण कारणीभूत असल्याचे बोलले जात होते. नंतर काही काळाने येथील बंजारा समाजाची घरे जळाली होती आणि गावांत मोठी दंगल पसरली होती. यानंतर ही गावांत बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या.     गावांत मोठया प्रमाणात हातभट्टी दारू विक्री केली जात असून अचलेर मध्ये मोठया प्रमाणावर अवैध धंदेही जोरात सुरू आहेत. यामुळे ही गावांतील शांतता वारंवार धोक्यात येत असून कायदा व सुव्यवस्था ही अडचणीत येत आहे. त्या मुळे गावातील अवैध धंदे व हातभट्टी दारू बंद करणे गरजेचे झाले आहे.