मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये आगमन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अक्कलकोट मध्ये आगमन

अक्कलकोट/प्रतिनिधी

अक्कलकोट येथील अतिवृष्टी ची पाहणी करण्यासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आज सकाळी 10- 30 वाजता  अक्कलकोट येथे आगमन झाले आहे.मुख्यमंत्री यांच्या समवेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषी मंत्री दादा भुसे सामान्य प्रशासन राज्यमंत्री दता भरणे मुख्यमंत्री यांचे सचिव मिलींद नार्वेकर, खासदार जयसिध्येश्वर स्वामी, माजी राज्यगृहमंत्री सिद्धाराम म्हेत्रे आमदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सह  अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विस्वस्त अमोल राजे भोसले तहसीलदार अंजली मरोड यांच्या सह शिवसेना उपप्रमुख गणेश वानकर अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड, तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, मनिष काळजे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 सोलापूर रोडवरील विजय बाग येथे मुख्यमंत्री यांचे सर्वप्रथम आगमन झाले. याठिकाणी मुख्यमंत्री यांचे नगराध्यक्ष शोभाताई खेडगी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, व खासदार डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी  यांनी त्यांचे स्वागत केले,सोलापूरच्या  पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते  अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे पोलीस उप अधीक्षक संतोष गायकवाड यांच्या सह इतर वरिष्ठ अधिकारी यांनी यावेळी उत्तम बंदोबस्त ठेवण्यात आली होती.

अक्कलकोट येथे स्वागत स्वीकारले नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगवी येथील अतिवृष्टी ची पाहणी केली,त्यानंतर मुख्यमंत्री हे सांगवी  येथील बोरी नदी च्या पात्रावर जाऊन  त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकरी बांधवांशी चर्चा केली. व झालेल्या नुकसानी बदल विचारपूस केली,