स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतीस अभिवादन 

स्व. अटलबिहारी वाजपेयींच्या स्मृतीस अभिवादन 

 

 

कराड/प्रतिनिधी : 

                        भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची शुक्रवारी 16 रोजी

पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्व. वाजपेयी यांच्या स्मृतीस अभिवादन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला. 

                      यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, तालुका चिटणीस महेश कुलकर्णी, विस्तारक सुनिल शिंदे, य.मो.कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष संजय पवार, मा. नगरसेवक हणमंतराव जाधव, युवा मोर्चा शहराध्यक्ष तानाजी देशमुख, उपाध्यक्ष विजेंद्र जाधव, दिलीप जाधव, जमीर शेख, सुर्यकांत खिलारे, मनोज येडगे, नंदकुमार बागल, मंगेश जाधव, धनाजी माने, विवेक पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.