अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीसह अन्य पिकांचे नुकसान

महाबळेश्वर सह आजूबाजूच्या परिसरात आज नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची  हजेरी. गारपिटीने स्ट्रॉबेरी सह अन्य पिकांचे नुकसान झालेने  अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे हवालदिल झालेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आता मात्र आस्मानी संकटाने देखील कंबरडे मोडले आहे. 

अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरीसह अन्य पिकांचे नुकसान

महाबळेश्वर

 महाबळेश्वर सह आजूबाजूच्या परिसरात आज नववर्षाच्या स्वागताला अवकाळी पावसाची  हजेरी. गारपिटीने स्ट्रॉबेरी सह अन्य पिकांचे नुकसान झालेने  अगोदरच कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे हवालदिल झालेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांचे आता मात्र आस्मानी संकटाने देखील कंबरडे मोडले आहे. 

आज हिंदु नववर्षाचे स्वागत घराघरात गुडी उभारून अगदीच साध्या पध्दतीनं करण्यात आले आहे. कोरोना  विषाणूचा धोका लक्षात घेता या विषाणूंना हरवूनन या वर  मात करण्यासाठी  येणारे २१ दिवस नागरिकांनी घरी बसूनच कोरोनाची ही साखळी तोडण्यास मदत करण्याचा संकल्प या दिवशी  करण्यात आला आहे. 
   दोन दिवसापासूनचं ढगाळ वातावरण होते. उकाडाही जाणवुलागल्याने अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नव्हती.त्यामुळे अवकाळी पाऊस कधी येईल याचा काही नेम देता येत नव्हता .दि २४ आज दुपारच्या   सुमारास आकाशात काळे ढग जमा होऊन कुठे कुठे  पावसाच्या तुरळक स्वरूपाच्या  सरी कोसळल्या.  मात्र आज सकाळ पासूनच आकाशात काळे ढग जमा झाल्याने ऊन सावलीचा खेळ सुरू होता.दुपारी १:३० च्या सुमारास मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरवात झाली.थोडी विश्रांती घेत पुन्हा एकदा पावसाने वादळी वारे व गारांसह जोरदार सुरवात केली.अश्यातच कोरोनामुळे शेतकऱ्यांचे शेत मालाचे नुकसान होत असतानाच आज झालेल्या अवकाळी पावसाने स्ट्रॉबेरी सह अन्य पिकांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त्यात हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणातही   कमालीचा गारवा निर्माण झाला होता. सद्या कोरोना व्हायरस मुळे या आधीच शासनाने जाहीर केलेल्या कर्फ्यू मध्ये या नैसर्गिक कर्फ्यु ची भर पडल्याने सगळीकडे शांतता पसरली आहे. घरात असल्याने त्यातच गर्मीचा त्रास सहन करीत असलेल्या महाबळेश्वरकरांना काही दिवस  हवेत गारवा निर्माण होऊन  गर्मी पासून थोडासा दिलासा मिळणार आहे.