बाधितांच्या मदतीमध्ये सरकारकडून घाणेरडे राजकारण - तृप्ती देसाई 

बाधितांच्या मदतीमध्ये सरकारकडून घाणेरडे राजकारण - तृप्ती देसाई 

 

 

कराड/प्रतिनिधी : 

                        येथील पाटण कॉलनीमध्ये अतिवृष्टी व महापुरामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. परंतु, याठिकाणी अजूनपर्यंत शासनाची 5 हजार रुपयांची रोख रक्कम मिळालेली नाही. इतर ठिकाणी रोख रक्कम दिली. मात्र, येथे अजूनपर्यंत का देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित करून याठिकाणी  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे घर असल्यामुळे सरकारने सूडबुद्धीने ही मदत दिलेली नाही. मदत पोहोचल्यास त्याचे श्रेय पृथ्वीराज चव्हाण यांनाच जाईल, या भीतीने सरकारने हे घाणेरडे राजकारण चालवले असल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केला.