बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान

बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर ही बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले. नुकतीच न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली असून यामध्ये शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान आहे.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान
सैदापूर : श्री. धनाजी शिंदे आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई खाशाबा शिंदे यांचा सत्कार करताना ना. नरेंद्र पाटील, सोबत, धनाजी शिंदे व कुटुंबीय.

बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यात शिंदे कुटुंबियांचे योगदान

ना. नरेंद्र पाटील  : सैदापूर येथे भेट देऊन शिंदे कुटुंबियांचा केला सत्कार 

कराड/प्रतिनिधी : 

          शासनाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणल्यानंतर अनेक शेतकरी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट ओढवले. परंतु, शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी सैदापूर येथील धनाजी शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शासनाकडे सातत्याने प्रयत्न केले आहेत. न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवत शर्यतीस परवानगी दिली आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्य लढ्यात शिंदे कुटुंबियांचे महत्वाचे योगदान असल्याचे गौरोवोद्गार माथाडी नेते ना. नरेंद्र पाटील यांनी काढले.

          सैदापुर ता. कराड येथील श्री. धनाजी शिंदे यांच्या घरी शनिवारी २५ रोजी  ना. नरेंद्र पाटील भेट घेऊन संपूर्ण कुटुंबियांचे आभार मानले. तसेच त्यांचा सत्कारही केला. याप्रसंगी शिंदे कुटुंबियांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

         यावेळी अक्षय शिंदे, राज शिंदे, राकेश चव्हाण, सचिन भोसले, सचिन पाटील, राहुल यादव, विक्रम जाधव, बाबासाहेब पाटील, गणेश पाटील, प्रमोद देवरास्ते व शिंदे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. 

         सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. यासाठी राज्यभरात अनेक लढे व आंदोलन करण्यात आली होती. सैदापुर श्री. धनाजी शिंदे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयहि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. शेवटपर्यंत त्यांनी शासनाकडे याचा पाठपुरावा केला असून अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले आहे. 

         यानिमित्ताने ना. नरेंद्र पाटील शनिवारी त्यांच्या घरी जाऊन शिंदे कुटुंबियांची भेट घेतली. तसेच ना. पाटील यांनी श्री. धनाजी शिंदे आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती हौसाबाई खाशाबा शिंदे यांचा सत्कार केला. तसेच याप्रसंगी माथाडी कामगारांचे आराध्यदैवत स्व. अण्णासाहेब पाटील व कै. खाशाबा दाजी शिंदे यांच्या स्मृतीस त्यांनी अभिवादन केले.