बाळासाहेब पाटील साताऱ्याचे पालकमंत्री होतील - श्रीनिवास पाटील

बाळासाहेब पाटील साताऱ्याचे पालकमंत्री होतील - श्रीनिवास पाटील

कराड/प्रतिनिधी : 
          आज दिव्यांग मुलांच्या अनेकविध समस्या आहेत. तसेच अशा मुलांसाठी काम करणाऱ्या विविध संस्थांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कराडचे प्रेरणा दिव्यांग केंद्रही अशा मुलांसाठी कार्यरत आहे. तुमच्या समस्यांबाबत तुम्ही कधीही माझ्याकडे या; मी तुमचे गार्‍हाणे मांडायला मी तयार आहे. त्याचबरोबर आपले बाळासाहेब पाटील सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, त्यांच्याकडेही आपण या प्रश्नाबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिले. 
           येथील स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय केंद्रात शनिवारी 4 रोजी दिव्यांग केंद्र, कराडच्या वतीने ब्रेन लिपीचे जनक लुइस ब्रेल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दीपमाला लोहाडे, दिलावर शेख व रघुनाथ बारड यांच्यासह सुप्रिया शेलार, अविभाऊ पाटील-वाठारकर, प्रवीण कचवा, सीमा नवले, लक्ष्मण खंडागळे, सुनील रांजणे उपस्थित होते.