बाळासाहेबांनंतर मी लोणंदकरांच्या पाठीशी ठामपणे उभा - आ. पृथ्वीराज चव्हाण

बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.

बाळासाहेबांनंतर मी लोणंदकरांच्या पाठीशी ठामपणे उभा - आ.  पृथ्वीराज चव्हाण
फलटण : बाळासाहेब बागवान यांच्या शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, यावेळी उपस्थित मान्यवर.

बाळासाहेबांनंतर लोणंदकरांच्या पाठीशी मी ठामपणे उभा - आ.  पृथ्वीराज चव्हाण 

फलटण/प्रतिनिधी : 
            सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनानंतर लोणंद पोरका झाला असे समजू नये. लोणंदच्या विकासासाठी जसे बाळासाहेब आग्रही असायचे त्याचप्रमाणे लोणंदकरांसाठी मी कायमच आग्रही असेन. तुम्ही हक्काने कधीही माझ्याकडे येऊ शकता. मी लोणंदकरांच्या पाठीशी कायम उभा असेन, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी लोणंदकरांना दिले आहे. 

            जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब बागवान यांचे काल निधन झाले. त्यानंतर आज शनिवारी 27 रोजी लोणंद शहरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर झालेल्या शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. 
          यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील आदींच्यासह भागातील प्रमुख नेते मंडळी उपस्थित होते. 
          आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व. बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व. काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
           दरम्यान, लोणंदचे नेते बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी भागातील प्रमुख नेते मंडळी व काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.