कॉलेज आवारात विना लायसन्स विनाकारण फिरणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांकडून कारवाई

कॉलेज आवारात विना लायसन्स विनाकारण फिरणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांकडून कारवाई
कॉलेज आवारात विना लायसन्स विनाकारण फिरणाऱ्यांवर बारामती शहर पोलिसांकडून कारवाई

कॉलेज आवारात विदाऊट लायसन्स विनाकारण फिरणाऱ्या मुलांवर बारामती शहर पोलिसांकडून कारवाई

बारामती / प्रतिनिधी,


                         बारामती शहरांमध्ये दुपारी व सायंकाळी अशा दोन शिफ्टमध्ये बरेच कॉलेज असतात या कॉलेज आवारामध्ये कॉलेज सुटण्याच्या वेळेस बरेच मुले विनाकारण विदाऊट लायसन या कॉलेज परिसरांमधून मोटारसायकली घेऊन विना नंबर प्लेट गाडी जोरात आवाज करत फिरत असतात अशा मुलांवर ती वेळोवेळी निर्भया पथक सुद्धा कारवाई करत असते


         परंतु काल दि.१७ एकाच वेळी बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ पोलीस निरीक्षक घोडके, मोटे, पाटील, यांच्या चार टीम तयार करून एकाच वेळी वेगवेगळ्या कॉलेजवर पाठविल्या. टी सी कॉलेज, आणि अनेकांत शाळा, राधेश्याम शाळा, रमाकांत शाळा, शाहू हायस्कूल, सातव कॉलेज, या ठिकाणी पोलिसांनी साध्या कपड्यात जाऊन दुपारी ३:०० वाजता दबा धरून कोलेज सुटण्याच्या वेळेस मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली.


                   याबाबत संबंधित शाळांमधील शिक्षक यांना सुद्धा अवगत करण्यात आले तसेच जे पालक आपल्या मुलांना स्वयंचलित स्पोर्ट बाईक देत आहेत अशा पालकांना पोलीस प्रशासनाच्या वतीने सूचना देऊन ज्या ज्या मुलांकडे लायसन्स नाही व गाडीला नंबर प्लेट नाहीत अश्या पालकांवर ती पाच हजार रुपये वाहतूक नियमानुसार दंड टाकण्यात येणार आहे