बेलवडेत 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

बेलवडेत 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी
बेलवडेत 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

बेलवडेत 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी 

 

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद : 135 रुग्णांची हिमोग्लोबीन व शुगर तपासणी  

 

कराड/प्रतिनिधी : 

          बेलवडे बुद्रुक येथे स्व. नारायण राजाराम मोहिते (आण्णा) यांचे स्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नवचैतन्य युवक गणेश मंडळ व नवचैतन्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरी यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या या शिबिराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. शिबिरामध्ये एकूण 190 रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, 

         आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मधुमेह, हृदयरोग, सांधेदुखी, गुडघेदुखी यांची तपासणी करून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. तसेच 135 रुग्णांची मोफत रक्ताची हिमोग्लोबीन व शुगर तपासणीही करण्यात आली. डॉ. सुशांत मोहिते यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच दरवर्षी अशाप्रकारे आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

          या शिबिराला डॉ. विजयसिंह पाटिल, डॉ. ओंकार काकरे, डॉ. प्रतिक मोटे व डॉ.सुशांत मोहिते यांची उपस्थिती होती. अ‍ॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी या कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली. या शिबिराला बेलवडे बुद्रुकच्या सरपंच सौ. सुनीता शिंदे, उपसरपंच संभाजी मोहिते , ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. 

           याप्रसंगी जगन्नाथराव मोहिते, जयवंतराव मोहिते,मारुती मोहिते, वसंतराव मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते. स्वागत सुरेश मोहिते व प्रास्ताविक दिगंबर शिंदे यांनी केले.