बेलवडे बुद्रुकमध्ये बिबट्याचा मृत्यू

बेलवडे बुद्रुकमध्ये उसाच्या शेतात मृत बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने बिबट्याचा मृत्यू एक-दोन दिवसापूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आले आहे.

बेलवडे बुद्रुकमध्ये बिबट्याचा मृत्यू
बेलवडे बुद्रुक : उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळला बिबट्या.

बेलवडे बुद्रुकमध्ये बिबट्याचा मृत्यू 

 

कराड/प्रतिनिधी : 

          बेलवडे बुद्रुक ता. कराड येथे बिबट्याचा मृत्यूू झाल्याची घटना बुधवारी सकाळी समोर आली आहे. बिबट्याचा हा सुमारेेे तीन वर्षाचा मादी बछडा असून याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. 

           याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील तेलक नावाच्या शिवारात बुधवारी सकाळी 10 वाजता उसाच्या शेतात वैरण काढायला गेलेल्या शेतकरी युवकाला शेतात बिबट्या पडला असल्याचे दिसून आले. शिवाजी बाळासो पवार रा. बेलवडे बुद्रुक ता. कराड असे शेतकऱ्याचे नाव आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्याने त्याठिकाणी पाहिले असता संबंधित शेतकरी युवकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ग्रामस्थांना दिली. त्यानंतर याबाबतची माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे. बिबट्याला पाहण्यासाठी शिवारात लोकांची मोठी गर्दी झाली होती. 

          दरम्यान, बेलवडे बुद्रुकसह आसपासच्या गावामध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना निदर्शनास आले होते. तसेच काही दिवसांपूर्वीच बेलवडेत शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्रे फस्त केल्याची घटना घडली होती. या परिसरात वारंवार बिबट्याचे होणारे हल्ले व ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बेलवडेसह कासारशिरंबे, मालखेड, कालवडे, कासेगाव, वाठार ग्रामस्थांकडून होत आहे.