बेलवडे बुद्रुक येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

बेलवडे बुद्रुक येथे मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर संपन्न

कराड/प्रतिनिधी :  

                        रिलायन्स फाऊंडेशन व कृष्णा हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र कराड व प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बु यांच्यावतीने बेलवडे बुद्रुक येथे मोफत सर्व रोग निदान व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरामध्ये सर्दी, ताप, खोकला, त्वचारोग, दंत तपासणी, फिजिओथेरपी, व्यायामाचे वेगवेगळे प्रकार व महिलांचे आजार याविषयी उपचार व प्रबोधन करण्यात आले.

                      यावेळी सरपंच सुनीता शिंदे, वैद्यकीय अधिकारी अनिता कदम, दौलत मोहिते, हर्षद मोहिते, महेश मोहिते, आरोग्य सेवक अंबादास माळी, आरोग्य सेविका बनसोडे, आशासेविका, अंगणवाडी सेविका, तसेच कृष्णा हॉस्पिटलचा सर्व स्टाफ व रिलायन्स फाऊंडेशनचे मारूती खडके , निवास निकम यांची उपस्थिती होती.

                    याशिबीरासाठी कृष्णा हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी विश्वास पाटील, माणिक साळुंखे व प्राथमिक आरोग्य केंद्र रेठरे बु व उपकेंद्र बेलवडे बुद्रुक तसेच ग्रामपंचायत बेलवडे बु यांचे विशेष सहकार्य लाभले.