भागप्पाअण्णा हरिजन यांच्या नावाचा दुरुपयोग

भागप्पाअण्णा हरिजन यांच्या नावाचा दुरुपयोग

अक्कलकोट  / महेश गायकवाड              

         संपुर्ण कर्नाटक राज्यात  चर्चेत असलेले दलित व बहुजन  चळवळीत सक्रिय असणारे व अन्याय अत्याचारविरुद्ध लढा देणारे भागप्पाअण्णा हरिजन यांच्या नावाचा दुरुपयोग करून व गैरफायदा घेत विजापूर जिल्ह्यातील काही समाजकंटक प्रतिष्टीत व व्यापारी उद्योजक व  शेतकरी आणि राजकीय व्यक्तींना नाहक त्रास देऊन व त्यांना धमकी देऊन त्यांच्याकडून मी भागप्पा अण्णा हरिजन  यांचे लोक आहोत. असे म्हणून विजापूर जिल्ह्यातील अनेक ठीकाणातून व कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यातुन मोठ्या प्रमाणावर खंडणी व लाखो रुपयांची   वसुली करत आहेत. या प्रकरणाशी व अशा वसुलीसाठी किंवा अशा कोणत्याही प्रकाराशी  भागप्पाअण्णा हरिजन यांचा   कोणताही संबंध नाही. जनतेने याची नोंद घ्यावी, असे आवाहन विजापूर येथे भागप्पा अण्णा हरिजन यांनी शी बोलतांना जाहीर केले. तरी जनतेच्या हितासाठी हे जाहीर आवाहन करीत आहोत असे  मानव सेवा फौंडेशन    अक्कलकोट चे अध्यक्ष दत्ताभाऊ  कांबळे आणि गुलबर्गाचे अरुणभाऊ भरणी  तसेच राजु कांबळे व भाई गणेश आलेगावकर यांनी  केले आहे.