ये अंधा कानून है .......?

भोसलेवाडी येथील संजय भोसले यांच्या मृत्यूप्रकरणी सातारा पोलीस अधीक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरणार

ये अंधा कानून है .......?

कुंकवाचा धनी अकाली सोडून गेला,मुलाच्या डोक्यावरील बापाचे छत्र हरपून दहा दिवस होऊन गेले परंतु धडक देऊन मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या दोषी आरोपीच्या गळ्यात कायद्याचा फास अडकवणार या एकाच ध्येयाने भोसलेवाडी ता.कराड येथील अक्षय भोसले याची सध्या धावपळ सुरू आहे घरातील कर्त्या व्यक्तीचा तिसऱ्याचा विधी आटोपून दुपारी बारा वाजता तक्रार देण्यासाठी आलेल्या कुटूंबाला रात्रीचे सात वाजेपर्यंत थांबायला लागते यावरून उंब्रज पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील 'ये अंधा कानून है'या गीता सारखी  परिस्थिती  भोसले कुटुंबियांवर कोसळली आहे.

सगळे परिस्थितीजन्य पुरावे हातात असताना चौकशीचा फार्स राबविण्याचा नक्की उद्देश काय याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरू असून नक्की अपघात की घातपात याबाबत चर्चा सुरू आहेत. नक्की पोलिसांवर कोणाचा दबाव आहे.समोर आलेले कॉल रेकॉर्डिंग अत्यंत धक्कादायक असून यामध्ये घडत असलेली चर्चा अनेक शंका व्यक्त करणाऱ्या आहे.तरीही उंब्रज पोलीस तपासबाबत उदासीनता दाखवत असल्याने 'दाल मे कुछ काला नही पुरी दाल ही काली है' असे म्हणायची वेळ भोसलेवाडी ग्रामस्थांवर आलेली आहे.

पालकमंत्री न्याय देणार

पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व घटना क्रम त्यांना सांगितला असता तात्काळ पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन करून घडलेल्या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री ना देसाई यांनी दिले आहेत.तसेच कराड उत्तर आ.बाळासाहेब पाटील यांना समक्ष भेटून याबाबत न्याय देण्याची मागणी सुद्धा केली आहे.तर भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे,भाजपा किसान मोर्चा राज्य सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी भोसलेवाडी येथे घरी येऊन सांत्वन केले आहे.

अक्षय संजय भोसले
भोसलेवाडी ता.कराड

उंब्रज पोलीस ठाण्याला बाजीराव पाटील,अरुण देवकर,हरिष खेडकर, अजय गोरड अशा कर्तबगार पोलीस अधिकाऱ्यांचा वारसा आहे.अनेक क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास या अधिकाऱ्यांच्या काळात झाला होता यामुळे उंब्रज पोलीस दलाचा वकुब जिल्ह्याच्या पोलीस दलात कायमच वरचढ राहिला होता.परंतु भोसलेवाडी येथील संजय भोसले यांचा मृत्यू अपघाती झाला की घातपात आहे या तपासाबाबत उंब्रज पोलिसांनी केलेली चालढकल ही उंब्रज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. 

अपघात घडल्यानंतर झालेली दिरंगाई पुरावे नष्ट करण्यासाठी चाललेला खटाटोप आहे.अशी कुटुंबातील व्यक्तींची तक्रार असून तपास चालू आहे या एकाच बाबीवर उंब्रज पोलिसांचे घोडे अडले आहे.यादरम्यान संबधित संशयित व्यक्तीने वाहनाची दुरुस्ती करून अनेक बोगस पुरावे तयार केले असण्याची शक्यता असून उंब्रज पोलिसांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याची भावना कुटुंबीय व्यक्त करीत आहेत.