वडीलांच्या पुण्यस्मरणानिमित्त विशाल भोसले व विक्रम भोसले यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य :- खासदार श्रीनिवास पाटील

वडीलांच्या पुण्यस्मरणानिमित्त विशाल भोसले व विक्रम भोसले यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य :- खासदार श्रीनिवास पाटील

उंब्रज/प्रतिनिधी

 

आबांची आठवण 

 

आई वडिलांचे संस्कार शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देत असतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भोसलेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते विशाल भोसले यांचे नाव उंब्रज विभागातून अग्रक्रमाने घेता येईल वडिलांना आबा म्हणणारे भोसले यांनी अतिशय कष्टातून आपल्या जीवनाचे मार्गक्रमण केले असून वडिलांचा मोठा प्रभाव त्याच्या वागण्या बोलण्यावर असल्याने द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त फुलझाड देण्याची संकल्पना परिसरातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत आहे.देशसेवेचे व्रत घेतलेले स्वर्गीय माजी सैनिक संताजी भोसले यांच्या मुलाने समाजसेवेचा घेतलेला वसा निरंतर असाच सुरू राहावा हीच आशा उंब्रज पंचक्रोशीतील नागरीक व्यक्त करीत आहेत.

 

भोसलेवाडी ता.कराड येथील दिवंगत माजी सैनिक संताजी हंबीरराव भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव विक्रम भोसले व विशाल भोसले यांनी राबवलेला उपक्रम स्तुत्य असून असे उपक्रम समाजातील इतर लोकांनी राबवणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

 

    भोसलेवाडी येथे विशाल भोसले यांनी वडील माजी सैनिक संताजी भोसले यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून गुरुवारी 400 सोनचाफा या फुल झाडांचे वृक्षदान वाटप खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते केले. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, ह भ प हरी महाराज गोपनर संचालक संजय थोरात  युवा नेते सागर पाटील तसेच माजी उपसभापती सुनील पाटील, कराड उत्तर राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष हेमंतराव जाधव, उद्योजक संजय पिसाळ,अमित जाधव, तसेच विविध मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

   खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, निसर्गाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन नितांत गरजेचे आहे. पुण्यस्मरण व इतर कार्यक्रमांमध्ये टॉवेल टोपी भेट देण्यापेक्षा लोकांना वृक्ष वाटप व वृक्ष संवर्धनाविषयी माहिती देणे गरजेचे आहे. विशाल भोसले यांनी वडिलांच्या पुण्यस्मरण निमित्त या कामाची सुरुवात केली आहे. याप्रसंगी ह भ प हरी महाराज गोपीनर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तन सेवेचा लाभ ग्रामस्थ व महिला वर्गाने घेतला.