राष्ट्रपुरुषांचा इतिहास ग्रंथरुपाने घराघरात पोहचला पाहीजे - पद्मश्री पोपटराव पवार

 राष्ट्रपुरुषांचा इतिहास ग्रंथरुपाने घराघरात पोहचला पाहीजे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. ते भोसरे येथील प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते. 

राष्ट्रपुरुषांचा इतिहास ग्रंथरुपाने घराघरात पोहचला पाहीजे - पद्मश्री पोपटराव पवार
प्रतापराव गुजर स्मृतिदिन सोहळा /भोसरे

 

वडुज/नितीन वायदंडे 
 
       राष्ट्रपुरुषांचा इतिहास ग्रंथरुपाने घराघरात पोहचला पाहीजे, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. ते भोसरे येथील प्रतापराव गुजर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलत होते.                       शुक्रवार दि.21 रोजी भोसरे ता.खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पहीले सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या  स्मृती दिनानिमित्त,देण्यात येणारा सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार  पद्मश्री पोपटराव पवार यांना डॉ.अविनाश पोळ, यांच्या हस्ते देण्यात आला.पवार पुढे म्हणाले कि, जय भवानी जय शिवाजी हे शेतकऱ्यांच्या  बांधापर्यंत पोहचले पाहीजे,पुढे त्यांनी आपल्या मनोगतात उपस्थिताना जलसंधारणाबद्दल मार्गदर्शन केले.
          या कार्यक्रमासाठी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निबांळकर, शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे पाटील,  माजी आमदार दिलीपराव येळगावकर, उपजिल्हाधिकारी विश्वास गुजर,सुधिर इंगळे इ.मान्यवर उपस्थीत होते.
        कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैराटगडावरुन आणलेल्या मशालीचे पुजन करुन गावातुन  ढोल,लेझिम ताश्याच्या गजरात मिरवणुक काढुन मान्यवरांच्या हस्ते मशालीचे पुजन,व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची  सुरुवात झाली.सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी देशमुख ,यानी कले प्रास्ताविक नितीन जाधव यांनी,तर आभार अमोल जाधव यांनी मानले.कार्यक्रमासाठी भोसरे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.