भुईंज मध्ये पुन्हा एकावर चाकूचे सपासप वार

गॅगवार पुन्हा भडकल्याने खळबळ उडाली आहे

भुईंज मध्ये पुन्हा एकावर चाकूचे सपासप वार
भुईंज मध्ये पुन्हा एकावर चाकूचे सपासप वार

वाई / दौलतराव पिसाळ 

भुईंज कृष्णा पुला शेजारी घरात घुसून  एकावर चाकूने सपासप वार केल्याने त्यात आदर इनामदार हे गंभीर जखमी झाल्याने ते गंभीर 
जखमी झाल्याने भुईंज गावात खळबळ ऊडाली आहे घटना स्थळाला पोलिस छावणीचे  स्वरुप प्राप्त झाले आहे आडीच महिन्या पुर्वीही  येथील एकाचा एका टोळीने हल्ला करुन तरुणाचा खुण केला होता हि घटना ताजी असतानाच पुन्हा अज्ञात तीन हल्लेखोरांनी जिवे मारण्याच्या उद्देशानेच आदर इनामदार यांच्या वर चाकूने सपासप वार केल्याने खळबळ ऊडाली आहे.

घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी कि पुणे सातारा महामार्गावरील भुईंज कृष्णा पुला जवळ राहणारे हणमंत किसन कणसे यांच्या घरात रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरात घुसून आदर जब्बार इनामदार यांच्या वर लाठ्या काठ्यांनी हल्ला करुन पोटात धारदार चाकूने सपासप वार केल्याने आदर इनामदार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना  जखमी अवस्थेत सातारा येथील खाजगी रुग्णालयात ऊपचारा साठी दाखल केले आहे