इको कारचा टायर फुटला,कार पलटी बुलेटस्वार जखमी

भुईंज पोलीस ठाण्याजवळील घटना,चारजण जखमी

इको कारचा टायर फुटला,कार पलटी बुलेटस्वार जखमी
इको कारचा टायर फुटला,कार पलटी बुलेटस्वार जखमी

वाई / प्रतिनिधी 

सातारा पुणे महामार्गावर इको कारचा टायर फुटल्याने समोर चालणाऱ्या बुलेटवर आदळून  कार पलटी होऊन डिवाडरला धडकल्याने त्या मधील दोन महिलासह चालक आणी बुलेटस्वार गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना समजताच  टीम अपघात स्थळावर दाखल होऊन जखमींना तातडीने ऊपचारा साठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतुन पाठवले . 

अपघातात दोन महिलांचा समावेश होता .भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की जिता  ता. पेण जिल्हा रायगड येथील रहिवासी असलेले येथुन अंजना विकला म्हात्रे वय ४३ रतन किशोर ठाकुर ५२ किशोर केशव ठाकुर वय ५९ विलास शिवाजी म्हात्रे वय ४५ असे चारजन इको कार क्र.एम.एच.०६ ऐ.झेड १९३३ मधुन कराड येथे औषधे ऊपचारा साठी निघाले असता त्यांची कार भुईंज ता.वाई गावच्या हद्दीतील भुईंज पोलिस ठाण्या पासुन २०० मिटर अंतरावर सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी  आली असता  कारचा पाठीमागील चालक बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार समोर चालत असणार्या बुलटवर कार जाऊन आदळल्याने बुलटस्वार निलेश श्रीपाल मुगदुम वय ४४ रा.पुणे   महामार्गावर फरफटत गेला आणी कार डिवाडरला जाऊन धडकुन ती पलटी झाल्याने कारमधील आणी बलेटस्वार असे सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत  .सर्व जखमींना भुईंज पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सातारा येथील सातारा हॉस्पिटल मध्ये ऊपचारा साठी दाखल केले आहे .या अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे . महा मार्गावरील  अपघात ग्रस्त वाहने भुईंज पोलिस कर्मचार्यांनी उचलुन बाजुला काढुन काही वेळातच तुंबलेली वाहतूक सुरळीत केली .