भाजप जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात!

भाजप जोमात, काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात!


विरोधकांना अहंकाराच्या वाळवीने संपविले 

भ्रष्टाचारामुळे काँग्रेस जनतेच्या मनातून उतरली हे वास्तव असताना, जनतेची तुटलेली नाळ बांधण्याऐवजी नाळेप2सून दूर जाण्याचा जे प्रयत्न करतात किंवा ज्यांनी केला, ते फार नीच प्रवृत्तीचे आहेत.  विश्वासघातकी हा शब्द  त्यांच्यासाठी  अपुरा पडेल. पक्ष अपयशी  होत असताना ढुंगणाला पाय लावून पळणारे कोठेही गेले तरी त्यांची नियत कधीच बदलणार नाही. भाजप हा राजकीय पक्ष आहे.  त्यात तो सत्ताधारी असल्याने, पक्षाकडे 
स्वतःहून कोणी येत असेल तर ते त्याच्या पथ्यावरच पडणारे असल्याने त्यांना दोष देत आदळआपट करण्यात काय अर्थ आहे? पक्षाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर केलेल्या चूका कशा सुधारता येतील आणि पुन्हा नव्याने धोरणे राबविण्याकडे कल राखला असता तर,  कदाचित आव्हानात्मक चित्र दिसले  असते.  परंतु "आयत्या बिळावर नागोबा  प्रधान" या उक्तीप्रमाणे राजकीय सत्तेद्वारे सुखे भोगणाऱ्यांना श्रमाचे मोल ते काय  कळणार? जो प्रकार लोकसभेच्या वेळी  झाला तसाच प्रकार विधानसभेच्या निवडणुका तोंडावर  येऊन ठेपलेल्या असताना होत असेल तर त्याना म्हणजे जे भाजपवासी झाले त्यांनाच हा प्रश्न आहे. पक्ष कोणताही  असो,  सर्वच एका  माळेचे मणी नसतात.  बोलताना  संताप अनावर झाला की,  रागाच्या  भरात पटकन बोलून जातात आणिनिषष्ठावंत मात्र नाहक दुखावता.   राजकीय आणि सामाजिक संघटनांमध्ये वावरणाऱ्या प्रत्येकाला याचे भान असणे गरजेचे आहे. मध्यंतरी एका चळवळीतील एका मित्राने "वारंवार काँग्रेस-राष्ट्रवादी भाजपबद्दल का चर्चा करता? आपले प्रश्न कमी आहेत का?आंबेडकरी जनतेच्या समस्या का दिसत नाहीत? " असे तावातावाने प्रश्न विचारले. तो ताकात असला तरी त्याच्यात आपलेपणाचा भाव असल्याची जाणीव  ठेवूनच वाटचाल सुरु ठेवणे मी माझे कर्तव्य समजतो. चर्चेच्या ओघात इतरांच्या घरात म्हणणार नाही, पण परिसरातील घटक या नात्याने पाहिले तर कोठे चुकले?  परंतु काही लोकांचे समज त्यांच्यापुरते मर्यादित असतात. पुढे सरकायचे नाव नाही. मी अशा पद्धतीला 'स्टॅच्यू' असे म्हणतो! आवाज व कोणत्याही प्रकारची  हालचाल न करता गुमान उभा रहा या पठडीतली मंडळी चळवळीत कमी नाहीत. 
   वर्तमानातील घडामोडींचा  विचार करता, विद्यमान स्थितीत राजकीय  स्तरावर होऊ घातलेले बदल लक्षात घेता, राजकीय स्तरावर आक्रमक धोरणाची कशी गरज आहे हे त्या परिप्रेक्षयात गेल्याशिवाय काहीच हाती लागणार नाही अशी आताची वेळ आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यासाठी इतरांकडे पाहताना  आपण आपले निरीक्षण करायला हवे, ही जी तक्रार आहे ती योग्यच म्हटली पाहिजे.  या चर्चेच्या अनुषंगाने राजकीय प्रांगणात परिवर्तनवादी चळवळीतील संघटना कशा कोलमडून पडतील याचा पद्धतशीरपणे कट रचला जात आहे. १७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत ओवैसी आणि आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीने प्रस्थापित पक्षांना चांगलेच नामोहरण केले. परिणामत: काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जसे सेना भाजपच्या वाटेवर गेले तसे काहीजण वंचित आघाडीतही समीर झाले आहेत.  पण तेवढ्याने काँग्रेसवाल्यानी आकांडतांडव न करता शांत राहणे पसंत केले हेही आपण समजून घेतले पाहिजे. याउलट भाजपच्या वाटेवर  जाणाऱ्यांचीच अधिक चर्चा आहे. वंचित आघाडीत येणार्‍यांमध्ये जे दाखल झाले अथवा होत आहेत, त्यामध्ये नेते फार  कमी असून, कार्यकर्त्यांची फौज आहे.  चळवळीला नेत्याइतकीच प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज आहे हेही आपण समजून घ्यायला हवे. हीच भूमिका काँग्रेसवाल्यांना लपवता आली नाही. गाव,  तालुका, जिल्हा, आणि प्रदेश स्तरावरील कार्यकर्ते  व दुय्यम नेते पक्ष का सोडतात? त्याची कारणमीमांसा करणे हे त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्यात इतरांनी लुडबूड करण्याची गरज नाही. तथापि याच पक्षाचे धुरीणआता भाजप प्रवेशानंतर  प्रतिक्रिया देताना "त्यापेक्षा वंचित" परवडले" या शब्दात आपल्या भूमिका मांडत आहेत. दु:ख व्यक्त करताना दिसतात! काँग्रेसचा राष्ट्रवादीवरचा विश्वास उडाला आहे.
          
                  भरवशाच्या म्हशीला टोणगा! 

 राष्ट्रवादी अर्धी रिकामी झाली असून, त्याचा मोठा फटका  बसणार हे गृहीत धरूनच काल काँग्रेसने वंचितशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादीशी युती तोवर काँग्रेसला वंचित ' किस झाड की मुली ' वाटत  होते. आज तु त्याच झाडाची मुळे आधार वाटत आहेत!  शिवेंद्रराजे, उदयनराजे भाजपच्या वाटेवर का जाऊ पाहतात? कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या   रयतश संस्थेच्या शाळेत शिकूनही शरद पवारांना परिवर्तनाचा स्पर्श झाला नाही. तो झाला असता तर कदाचित राज्याचे चित्र वेगळे दिसले असते. वसंतदादा पाटील,  संगमा यासारख्या नेत्यांना  धोबीपछाड देत सवतासुभा निर्माण करणार्‍यांना धडा शिकविण्यासाठी काळ पुढे  सरसावत आहे हे केवढे सत्य आहे. वंचित आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीत १२ जागांची मागणी करत असताना २४  जागेवर ठार राहिलेल्या शरद पवार यांच्यावर ही नोबत यावी?  लढाईत हारजीत असतेच,  पण पक्ष संकटात असताना सोडून जातात त्यावेळी पक्षांबरोबरच नेत्याविषयीचा आदर अधोरेखित होतो हे आपण समजून घेतले पाहिजे.  न्या. बी. जी. कोळसेपाटील यांना राज्यसभेवर निवडूनआणण्याचचे आश्वासन देऊन वंचितआघाडीततून फोडण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या शरद पवारांना राष्ट्रवादीचे अवशेष पहायला मिळाले तरी पुरेसे काँग्रेसमध्आहेत. अॅड.  बाळासाहेब आंबेडकर शरद पवार असतील तर आघाडी नाही असे जे   म्हणतहोतेतेत्याचे उत्तर न्या. कोळसेपाटील आघाडीतून बाहेर
 पडले.तेव्हाचमिळाले होते. 
लक्ष्मण माने यांनी निडणुकीनंतर घेतलेल्या फारकतीमुळे  शिक्कामोर्तब झाले आहे! राष्ट्रवादीतून ३० पेक्षाही अधिक नेत्यांचे आऊटगोइंग झाले असून त्यांच्याबरोबर हजारो कार्यकत्यांचा लवाजमा भाजपाच्या दारी गोळा झाला आहे. अशावेळी धापा टाकत येणार्‍या राष्ट्रवादीच्या नाकदुऱ्या सांभाळत बसण्यापेक्षा वंचित परवडले असा  दुरगामी विचार काँग्रेसने केलेला दिसतो.
  ..........
गुणाजी काजिर्डेकर
राजकीय विश्लेषक
मुंबई