Blast: काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू, 180 हून अधिक जखमी

काबूल - अफगाणिस्तानच्या राजधानीत भीषण बॉम्बस्फोटात किमान 63 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एका लग्नसमारंभात घडवण्यात आला. या ठिकाणी शेकडो लोकांची उपस्थिती होती. स्फोटानंतर 180 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातही जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शिया बहुल भागात आत्मघातकी हल्ला...मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी रात्री लग्न समारंभ सुरू असताना घडली. लग्नाच्या पार्टीत एक आत्मघातकी हल्लेखोर घुसला आणि कंबरेला बांधलेले स्विच दाबले. ही घटना राजधानीतील शिया मुस्लिम बहुल भागात घडली आहे. अफगाणिस्तानच्या शिया बहुल भागांमध्ये प्रामुख्याने तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून हल्ले घडवले जातात. परंतु, तालिबानने आरोप फेटाळले आहेत. बॉम्बस्फोटाच्या अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर त्याचे फोटो जारी करण्यात आले. अनेकांनी फोटो पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. रात्रभर बचावकार्य झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास प्रशासनाने स्फोटाची आणि मृतांची अधिकृत माहिती जारी केली.ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या राजधानीत शिया समुदायाचा लग्न सोहळा सुरू होता. पारंपारिक कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष पाहुण्यांसाठी दोन वेग-वेगळा विभाग तयार केले जातात. महिलांसोबत लहान मुलांना तर पुरुषांना वेगळ्या हॉलमध्ये बसवले जाते. आत्मघातकी हल्लेखोराने पुरुषांच्या दालनात स्फोट घडवला. स्फोट इतका भीषण होता की जवळपास अर्धा तास हॉलमध्ये धूर पसरला होता. काय घडले आणि किती लोकांचा जीव गेला हे दिसूच शकले नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका पोहोचल्या आणि मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds


 Blast: काबूलमध्ये लग्न समारंभात बॉम्बस्फोट, 63 जणांचा जागीच मृत्यू, 180 हून अधिक जखमी

काबूल - अफगाणिस्तानच्या राजधानीत भीषण बॉम्बस्फोटात किमान 63 जणांचा जागीच मृत्यू झाला. हा स्फोट एका लग्नसमारंभात घडवण्यात आला. या ठिकाणी शेकडो लोकांची उपस्थिती होती. स्फोटानंतर 180 हून अधिक जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातही जखमींपैकी अनेक जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शिया बहुल भागात आत्मघातकी हल्ला...

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना शनिवारी रात्री लग्न समारंभ सुरू असताना घडली. लग्नाच्या पार्टीत एक आत्मघातकी हल्लेखोर घुसला आणि कंबरेला बांधलेले स्विच दाबले. ही घटना राजधानीतील शिया मुस्लिम बहुल भागात घडली आहे. अफगाणिस्तानच्या शिया बहुल भागांमध्ये प्रामुख्याने तालिबान आणि इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून हल्ले घडवले जातात. परंतु, तालिबानने आरोप फेटाळले आहेत. बॉम्बस्फोटाच्या अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर त्याचे फोटो जारी करण्यात आले. अनेकांनी फोटो पोस्ट करून या घटनेची माहिती दिली. रात्रभर बचावकार्य झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास प्रशासनाने स्फोटाची आणि मृतांची अधिकृत माहिती जारी केली.


ब्रिटिश माध्यम बीबीसीच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानच्या राजधानीत शिया समुदायाचा लग्न सोहळा सुरू होता. पारंपारिक कार्यक्रमांमध्ये महिला आणि पुरुष पाहुण्यांसाठी दोन वेग-वेगळा विभाग तयार केले जातात. महिलांसोबत लहान मुलांना तर पुरुषांना वेगळ्या हॉलमध्ये बसवले जाते. आत्मघातकी हल्लेखोराने पुरुषांच्या दालनात स्फोट घडवला. स्फोट इतका भीषण होता की जवळपास अर्धा तास हॉलमध्ये धूर पसरला होता. काय घडले आणि किती लोकांचा जीव गेला हे दिसूच शकले नाही. तोपर्यंत रुग्णवाहिका पोहोचल्या आणि मृतदेह तसेच जखमींना बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds
bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds
bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds
bomb blast at a wedding in Afghanistan capital kills dozens, injures hundreds