'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...!

उलटा चोर कोतवाल को दाटे,किती दिवस असं चालायचं

'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...!
'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...!

'वाघ' साहेब बोरगाव पोलिसांचे वागणं बरं नव्ह...!

"उलटा चोर कोतवाल को दाटे<,किती दिवस असं चालायचं....

उंब्रज/प्रतिनिधी

पेरले गावच्या हद्दीत रविवार दि.६ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पुणे ते कोल्हापूर जाणाऱ्या महामार्गावर सिंधुदुर्ग येथे जाणारे एक गृहस्थ आपल्या स्विफ्ट गाडीतून जात असताना पाठीमागून येणाऱ्या गाडीने जोराची धडक दिली.परंतु बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यु.एस.  गायकवाड यांनी कर्तव्यात कसूर करून पाठीमागून धडक देणाराला सोडून देऊन पर जिल्ह्यातील कुटुंबाला नाहक देत पोलीस ठाण्याची वारी करायला लावली.यामुळे "उलटा चोर कोतवाल को दाटे" याची अनुभूती त्या वाटसरूला दिली.यामुळे "वाघ साहेब बोरगाव पोलिसांचे वागणे बरं नव्ह" अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

याबाबत झालेली घटना  तक्रारदार यांनी  आपल्या शब्दात सांगितली आहे.मी लक्ष्मण मनोहर गावडे,रा कणकवली ,जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझा मित्र नितीन पेडणेकर आचरा,अस दोघे जण आज दि,06/12/2020 रोजी मुंबई ते कोल्हापूर रस्त्यावरून प्रवास करत असताना ,ता.सातारा मधील बोरगाव पोलीस हद्दीत पेरले गावा नजीक माझ्या गाडीला एका स्विफ्ट गाडीने मागून धडक दिली,या धडकेमध्ये माझ्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले ,परंतु माझ्या गाडीला  ज्या गाडीने ठोकले ,त्या गाडीच्या ड्राइविंग सीट वर जी व्यक्ती बसली होती त्याने आपली ओळख पोलीस अधिकारी असल्याचे सांगितले,आणि माझी काहीही चुक नसताना माझ्याकडून पाच हजाराची मागणी केली,परंतु मी सदर व्यक्तीला असे सांगितले की मी तुमच्या गाडीला ठोकलेले नाही,तर तुम्ही माझ्या गाडीला मागून ठोकले आहे,त्यामुळे माझा पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही,त्यानंतर त्या व्यक्तीने आपल्या पदाचा दुरुउपयोग करत,बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार यु एस गायकवाड यांना बोलावले,त्यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळत मला मुद्दाम पोलीस स्टेशनला यायला सांगितले,,अस करताना ज्या व्यक्तीने पोलीस बोलावले ती व्यक्ती आणि त्याची गाडी पोलीस स्टेशनला न आणता ,,माझ्या गाडीला मागून ठोकलेले असताना सुद्धा मला मात्र,पोलिस स्टेशनला नेण्यात आले,,

         त्यानंतर माझे मित्र आणि उद्योजक  विशाल भोसले यांच्या सदर प्रकार कानावर घातला त्यांनीही आणि त्यांच्या सातारा व रत्नागिरी येथील मित्रांनी माझ्या हाकेला धावत झाला प्रकार समजावून घेतला आणि माझी चूक नसताना मला पोलीस स्टेशनला का आणले याची विचारणा  केली,गाडीला ठोकणार व तक्रार देणारा स्पॉट वरून निघून गेला आणि ज्याच्या गाडीला ठोकले त्याला मात्र पोलिसांनी नाहक त्रास दिला,,जर मी कुणाला ठोकले नाही तर मला 2 ते 3 तास थांबवून पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात तक्रार नसताना मला नाहक त्रास का दिला?????? असे जर सामान्य माणसांवर अन्याय एखादा अधिकारी करत असेल आनि त्याला पोलीस साथ देत असतील तर आम्ही न्याय मागायचा कुठे*????
2 ते 3 तास सदर इसमाने मला स्पॉट वर उभे करून आपल्या ओळखीच्या लोकांना बोलावून माझ्यावर पैसे देण्यासाठी दबाव आणून , आणि पैसे नाही दिले म्हणून पोलिसांकरवी मला 15 ते 20 किलोमीटर परत पोलीस स्टेशनला नेऊन मानसिक त्रास देणाऱ्या पोलीस यंत्रणेचा मी निषेध करतो श्री, लक्ष्मण मनोहर गावडे कणकवली सिंधुदुर्ग