ब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

बेलवडे ब्रुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच गावातील बारावीच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा  येथील ब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

ब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
दहावीत पहिला क्रमांक मिळवलेली विद्यार्थीनी शितल वडार हिचा सत्कार करताना चेअरमन मारुती मोहिते व इतर
ब्रह्मदास विद्यालयाचे यश : दहावीचा निकाल 100 टक्के, तर बारावीच्या विद्यार्थ्यांचेही उज्जवल यश 

राड/प्रतिनिधी :

           बेलवडे ब्रुद्रुक ता. कराड येथील ब्रह्मदास विद्यालयातील इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच गावातील बारावीच्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा  येथील ब्रह्मदास पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

            येथील ब्रह्मदास पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा हा सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी संस्थेचे चेअरमन मारुती मोहिते (आबा), संस्थापक वसंतराव मोहिते (सर), माजी सरपंच पांडुरंग मोहिते (सर), जेष्ठ नागरिक गणपती माने,  जयवंतराव मोहिते, एल. बी. मदने (सर),  ग्रामस्थसंस्थेचे व्यवस्थापक उमेश पाटील,  सर्व संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. 

           बेलवडे येथे कासेगाव शिक्षण संस्था, कासेगाव ता. वाळवाचे ब्रह्मदास विद्यालय असून या विद्यालयाची नेहमीच इयत्ता दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा राहिली आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्येही दहावीच्या निकालात विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली असून यावर्षी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे.

           विद्यालयाच्या शितल जयसिंग वडार 96.20 टक्के, सानिका उदयसिंह मोहिते 95, साक्षी मधुकर मोहिते 92.20, प्रतीक्षा संपत साळुंखे 92.20, पूजा जयकर मोहिते 90.60, जिज्ञासा दत्तात्रय मोहिते 90, मयुरी शिवाजी तडाखे 79.60 या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच इयत्ता बारावीमध्ये भूषण शिवाजी मोहिते 85.80 व तेजस सुनिल मोहिते यांनी 68 टक्के इतके गुण प्राप्त केले आहेत. त्याचबरोबर श्रेया मुकुंद पाटणकर ही विद्यार्थिनी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेस पात्र ठरली असून या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचा पतसंस्थेच्या वतीने गुणगौरव व सत्कार करण्यात आला.

          बेलवडे गावचे सुपुत्र, ब्रह्मदास पतसंस्थेचे संस्थापक वसंतराव मोहिते (सर) यांचा विद्यालयाच्या यशात मोलाचा वाटा आहे. ब्रह्मदास विद्यालयामध्ये मुख्याध्यापक पदावर कार्यरत असताना त्यांनी शाळेचा निकाल 100 लावून उल्लेखनिय कार्य केले आहे. या कामगिरीसह नुकतेच मुख्याध्यापक पदावरूनही ते सेवानिवृत्त झालेबद्दल पतसंस्थेच्या वतीने चेअरमन मारुती मोहिते यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

         याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना वसंतराव मोहिते म्हणाले, गावातील ब्रह्मदास विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर कालांतराने विद्यालयाच्याच कासेगाव शिक्षण संस्थेत मला शिक्षक म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळाली. या कालावधीत संस्थेच्या विविध विद्यालयांमध्येही उत्कृष्ठ पद्धतीने कार्य करत नवनवीन शिक्षणपद्धतींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यावर भर दिला. योगायोगाने संस्थेने माझ्यावरच माझ्या ब्रह्मदास विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सोपवला. ही जबाबदारी सांभाळताना मी विद्यालयाच्या यशाचा आलेख नेहमी चढता ठेवण्याची जबाबदारीही स्विकारली. त्यात चालू शैक्षणिक वर्षासह माझ्या सेवानिवृत्ती वर्षात विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागला, याचा आनंद आहेच. पण, संस्थेतील माझ्या संपूर्ण सेवाकाळातील माझे अनेक विद्यार्थी आज यशस्वी असून विविध क्षेत्रात ते उच्च पदावर कार्यरत आहेत. याचा मला सार्थ अभिमान असून हीच माझ्या कार्याची खरी पोहोचपावती असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.     

          दरम्यान, या यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या विद्यालयातील सर्व मार्गदर्शक शिक्षकांचेही पतसंस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. तसेच, या सर्व यशस्वी विद्यार्थांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी संस्थेचे संस्थापक, चेअरमन,  सर्व सभासद, कर्मचारी व बेलवडे ब्रुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.

      …………………………………………………… 

ब्रम्हदास विद्यालयात दहावीच्या निकालाची उज्वल परंपरा राहिली आहे. यावर्षी विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून येथील बारावीच्या विद्यार्थ्यांनीही  उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. हे सर्व विद्यार्थी यापुढेही त्यांच्या उज्वल यशातून नक्कीच गावासह त्यांचे कुटुंबीय व विद्यालयाचाही नावलौकिक वाढवतील. 

           - मारुती मोहिते

     (चेअरमन, ब्रह्मदास पतसंस्था)