उंब्रज येथील भैरवनाथ वीटभट्टी संघटनेचा १ लाख ७० हजारांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द

कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.उंब्रज (ता.कराड) येथील भैरवनाथ वीटभट्टी संघटना यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.

उंब्रज येथील भैरवनाथ वीटभट्टी संघटनेचा १ लाख ७० हजारांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द

उंब्रज- कोरोनाचे संकट काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करीत आहेत.सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.उंब्रज (ता.कराड) येथील भैरवनाथ वीटभट्टी संघटना यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे आज सुपूर्द केला.

 

कोरोना (कोविड १९)विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य सरकारने लॉकडाउन वाढवला असून सरकारच्या उत्पन्नच्या स्रोतावर मर्यादा आल्या आहेत. शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्थांमार्फत व वैयक्तिक पातळीवर मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे उंब्रज (ता.कराड) येथील भैरवनाथ वीटभट्टी संघटना यांनी सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहयत्ता निधीसाठी रुपये १ लाख ७० हजार रुपयांचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर सर्जेराव जाधव, हरीचंद्र कुऱ्हाडे, राजीव रावळ, अरुण थोरात उपस्थित होते.

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पाठबळ म्हणून  मुख्यमंत्री सहायता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती व संस्थानी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याला अनुसरून गेल्या काही दिवसांपासून या निधीकडे आर्थिक मदत जमा करण्याचा ओघ सुरू झाला आहे. त्यामुळे निधीत सुमारे १९७ कोटी रुपये जमा झाले आहेत. सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याबरोबर राज्यातून अनेक सामाजिक व्यवसायिक संघटना व व्यक्तिगत दानशूर व्यक्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश सुपूर्द करीत आहेत.