केंजळगड पाहण्यासाठी जात असताना १० वर्षीय बालक दरीत कोसळला

केंजळगड पाहण्यासाठी जात असताना १० वर्षीय बालक दरीत कोसळला

केंजळगड पाहण्यासाठी जात असताना १० वर्षीय बालक दरीत कोसळला 

वाई / दौलतराव पिसाळ 

केंजळगड पाहण्यासाठी साठी जात असताना मयंक उरणे वय १० वर्ष हा खोल खड्यात  कोसळून गंभीर जखमी झाला त्यास पाकेरी 
ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढला असे मदत कार्य केल्या बद्दल वाई तालुक्यातील नागरीकांनी पाकेरीवस्ती वरील नागरिकांचे 
अभिनंदन केले आहे त्यांच्या अथक प्रयत्ना मुळे मयंक याचा जीव वाचला आहे  
 
थंड हवा पावसाची रिप रिप आणी पडलेल्या दाट धुक्यातुन गुडघ्यावर असणार्या गवतातुन  पाऊल वाटेतुन पाऊल वाट शोधत सासवड ता.पुरंदर   परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक   केजळगड पाहण्यासाठी  जात असताना मयंक गणेश उरणे वय १० वर्ष हा वडील गणेश उरणे यांच्यासह मित्रांन बरोबर केंजळगड पाहण्यासाठी घनदाट गवतातुन  जात असताना तो पाय घसरून खाली खोल खड्यात पडला त्याची शोधा शोध केली असता तो सापडत नसल्याने हे सर्वजण आदल्या दिवशी मुक्कामी असलेल्या आसरे रायरेश्व रस्त्यावर असणार्या पाकेरे वस्ती वर येऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली असता तेथील गंगाराम सपकाळ सागर पाकीरे सुरेश पाकीरे रामदास पाकीरे सचिन पाकीरे नवनाथ पाकीरे विलास पाकीरे विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांना सोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले असता त्यांनी खोल दरीतून त्याला 
गंभीर जखमी अवस्थेत शोधुन बाहेर काढला त्याला सातारा येथील रुग्णालयात ऊपचारा साठी दाखल केला आहे