साखरवाडी(चोरे)तील जवान संदीप पिंपळुस्कर यांचे अल्पशा आजराने दुर्देवी निधन

गावावर शोककळा

साखरवाडी(चोरे)तील जवान संदीप पिंपळुस्कर यांचे अल्पशा आजराने दुर्देवी निधन


साखरवाडी(चोरे)तील जवान संदीप पिंपळुस्कर यांचे अल्पशा आजराने दुर्देवी निधन. गावावर शोककळा


उंब्रज/प्रतिनिधी


       साखरवाडी(चोरे)येथील भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावणारे युवक कै संदीप परशुराम पिंपळुस्कर यांचे सेवा बजावताना अल्पशा आजाराने निधन झाले. ते 37 वर्षे वयाचे होते.


         कै संदीप यांच प्राथमिक शिक्षण साखरवाडी या जन्मगावी झाले.जिजामाता विद्यालय चोरे येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.सैन्यात भरती होण्याची आवड त्यांना लहानपनापासून होती.2002साली ते सैन्यात भरती झाले.


        मनमिळाऊ हसतमुख दिलखुलास स्वभाव असल्याने ते रजेवर आले की कायम मित्रमंडळी सोबत असायचे गावातील अनेक धार्मिक, सार्वजनिक कामात त्यांचा आर्थिक सहभाग असायचा. गावातील लहान थोर मंडळींना त्यांचा स्वभाव आवडत असल्याने ते परिसरात सुपरिचित होते.


          हिमाचल प्रदेश ते सध्या सैन्यदलात कार्यरत होते. सेवा बजावत असताना त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना प्रथम चंदीगड येथे नंतर दिल्ली येथे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला.


       कै संदीप यांचे पासच्यात पत्नी मुलगी आई वडील भाऊ असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव देह दिल्लीहून रात्री पुणे येथे विमानतळावर येणार आहे. आज सकाळी अकरा वाजेपर्यंत त्यांचा अंत्यसंस्कार साखरवाडी येथे करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. संपूर्ण चोरे साखरवाडी येथे शोककळा पसरली आहे.