काँग्रेसच्या प्रचारार्थ कराडात वासुदेव आला

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात सध्या विविध पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धूम धडाका सुरू आहे. त्यात प्रचारासाठी आधुनिक पद्धतीसह पारंपारिक पद्धतीचाही वापर करण्यावर भर दिला जात आहे. पूर्वी वासुदेव, पिंगळा हा पारंपरिक पद्धतीने पहाटेच्या सुमारास गावोगावी आपल्या गीताच्या माध्यमातून जनजागृती करताना आढळून येत असे. आत्ता हा पिंगळा व अन्य चालीरीती, प्रथा, परंपरा दुर्मिळ होत चालल्याची परिस्थिती आहे. 
                     मात्र, शनिवारी दुपारी येथील दत्त चौकासह शहरात अचानक आपल्या सहकाऱ्यांसह वासुदेव, पिंगळा अवतरला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे उमेदवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करण्यासाठी  पारंपारिक पद्धतीवर भर दिला जात आहे. त्यानुसार पिंगळा गीत म्हणत त्यांची पारंपरिक पद्धतीचा वेष परिधान करून हातात काँग्रेसचे चिन्ह घेऊन ते पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रचार करत असल्याचे दिसून आले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.