काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस

काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस

कराड/प्रतिनिधी : 

                        गेल्या पाच वर्षात राज्यात आम्ही विकास करण्याचा प्रयत्न केला.  परंतुशिक्षणाच्या बाबतीत देश आठव्या क्रमांकावरून तेराव्या क्रमांकावर गेल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांनी केली. मात्रयाआधी आरोग्याच्या दृष्टीने देश तिसऱ्या क्रमांकावर असताना तो आठव्या क्रमांकावर कसा गेलायाचे उत्तर त्यांनी आधी द्यावे. तसेच तीन महिन्याच्या आतच खासदार उदयनराजे भाजपात गेल्याने त्यांनी लोकशाहीचा खून केल्याचेही ते म्हणाले होते. मात्रकाँग्रेस-राष्ट्रवादीची परिस्थिती पाहता आणि त्यांचे विविध निर्णय पाहता काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार राहिला नसल्याची घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

                       कराड येथे रविवारी 15 रोजी महाजनादेश यात्रा संपन्न झाली. त्यानंतर सोमवारी 16 रोजी येथील हॉटेल फर्न येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी खासदार उदयनराजे भोसलेआमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, माजी सभापती शिवाजीराव देशमुख, पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सत्यजित देशमुख, शहराध्यक्ष एकनाथ बागडे आदींची उपस्थिती होती.