कॉटेजमधून 31 रुग्णांना सह्याद्रीत हलविले

कॉटेजमधून 31 रुग्णांना सह्याद्रीत हलविले

 कराड/प्रतिनिधी : 

         येथील सौ. वेणूताई चव्हाण शासकीय उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज) एका गर्भवती महिलेच्या माध्यमातून रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार घडला होता. रुग्णालयात 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनाने तडकाफडकी उपजिल्हा रुग्णालयाची कोविड 19 मान्यता रद्द केली आहे. तसेच तेथील कोरोना कक्ष सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलविण्याची सूचना नुकतीच विभागीय आयुक्त डॉ. म्हैसकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी 11 रोजी सायंकाळी उपजिल्हा रुग्णालयातील 31 जणांना सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.