संचारबंदीचा फायदा : भाजी व किराणा जादा दराने विक्री

जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागल्याने दुकानदार या संचारबंदीचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत दुकानातील प्रत्येक वस्तू चढ्या भावाने विकून नागरिकांच्या पिशवीत भरून देत संचारबंदीचा फायदा नफ्यात करू लागल्याने ग्रामीण जनतेची इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाल्याने जिल्हा पुरवठा प्रशासनाने यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करून गैरकृत्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वाईच्या ग्रामीण जनतेतून केली जात आहे

संचारबंदीचा फायदा : भाजी व किराणा जादा दराने विक्री


सापडल्यास कडक कारवाई - रणजित भोसले
 वाई /प्रतिनिधी
कोरोना व्हारयसच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुकारलेल्या बंदमुळे जीवनावश्यक माल वहातुकीवर परिणाम झाल्याने वाई शहरासह तालुक्याच्या पुर्व व पश्चिम संपुर्ण ग्रामीण भागात पहिल्याच आठवड्यात किराणा व जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासू लागल्याने दुकानदार या संचारबंदीचा गैरफायदा घेत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत दुकानातील प्रत्येक वस्तू चढ्या भावाने विकून नागरिकांच्या पिशवीत भरून देत संचारबंदीचा फायदा नफ्यात करू लागल्याने ग्रामीण जनतेची इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाल्याने जिल्हा पुरवठा प्रशासनाने यावर तातडीने योग्य ती उपाययोजना करून गैरकृत्य करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वाईच्या ग्रामीण जनतेतून केली जात आहे 
संपूर्ण देशात आधी कर्फ्यु व त्याचे आजपासून संचारबंदीत रूपांतर झाल्याने संपूर्ण वाई शहरासह तालुक्यातील गावांचा जिल्हा प्रशासनाने पोलिसांकडे ताबा सोपवला आहे त्यामुळे पोलीस यंत्रणा 24 तास सज्ज राहून नागरिकांना रस्त्यावर न येण्याचे आव्हान करत आहे पण जीवनावश्यक वस्तुंची(अन्नधान्य भाजीपाला) तुटवडा भासत आहे परगावी नोकरी निमित्त असलेले घरातील सर्व सदस्य गावाकडे आल्याने घर प्रपंचातदैनंदिन लागणाऱ्या किराणा माल भाजीपाला यांच्या खरेदीसाठी चोरट्या पायांनी दुकानापर्यंत पोचले असता त्या ठिकाणी व्यापारी मागतील एवढे पैसे देवून चढ्या दरात माल खरेदी करावा लागत आहे संचारबंदीच्या आधी अल्पदरात मिळणाऱ्या वस्तू आज महागड्या मिळत असल्याने ग्रामीण जनतेला आपला प्रपंच कसा चालवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामीण भागातील पन्नास टक्के जनता ही दररोज मजुरी करून त्याचे संध्याकाळी मिळणाऱ्या पैशावर चूल पेटवून पोटाची खळगी भरतात निदान जिल्हा प्रशासनाने अशा गंभीर बाबींचा गावपातळीवरील सर्कल तलाठी यांचे मार्फत सर्वे करून दर निश्चितिचे योग्य नियंत्रण ठेवून तशा प्रकारचे दर फलक लावण्याची सक्ती करावी जेणेकरून व्यापारी वर्गा कडून होणारा जीवानावश्यक वस्तूंच्या साठ्याला आळा बसून योग्य दरात विक्री सुरू होईल त्यास दुसरा पर्याय म्हणून गावोगावच्या स्वस्त धान्य दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी किराणा मालाचे सर्व साहित्य पुरवून संचारबंदीच्या काळातील दिवसांमध्ये  ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्याचे आदेश द्यावेत त्यामुळे नागरिकांना नाहक आर्थिक बुर्दड सहन करावा लागणार नाही देशावर आणि राज्यावर कोरोनो विषाणूंचा फ़ैलाव आणि प्रहार झाल्याने केंद्र व राज्याने जमावबंदीचे आदेश जनहितासाठी लागू केले आहेत हे जरी खरे असले तरी पोलिसांच्या दंडुकशाही पुढे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही त्याचा गैरफायदा आज भाजीपाला विक्रेते व किराणा मालाचे व्यापारी घेताना दिसत आहेत वास्तविक पहाता तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी भाजी विक्रेते व किराणा मालाचे दुकानदार यांना दर निश्चिती करून देणे आज तरी गरजेचे आहे.
 वाई शहरासह कोरोना व्हायरसचा फटका हळूहळू वाईच्या सर्व ग्रामीण भागात दिसू लागला आहे. कलम 144 आणखी 21 दिवस सुरू रहाणार असल्याने नागरिकांनी रोजच्या घरगुती गरजेसाठी लागणारा किराणा व अन्य जीवनाव श्यक वस्तू एकदम खरेदी करण्यासाठी किराणा दुकानात झुंबंड उठवली आहे जो तो कमीतकमी 15 दिवसाचा माल एकदम खरेदी करण्यासाठी धडपड करत आहे त्यात पुणे मुबंई करांची भर पडल्याने जास्तीचा माल खरेदी करणे भाग पडत असल्याने किराणा खरेदी ग्रामीण जनतेच्या अंगलट येत आहे .