मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू 

मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू 


सोलापूर / महेश गायकवाड
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे वीज पडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी दोनच्या सुमारास घडली.
पंतूसिंग जीवनसिंग रजपूत (वय ४०), संकेत शिवानंद चौरमोले (वय १७), पार्वती मलप्पा कोरे (वय ४४) असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत तर रविकांत राजकुमार मुळे (वय ९३) व धरेप्पा लिंगप्पा म्हेत्रे (वय ९२) हे दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे