ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकाऱ्यांची टोळी जेरबंद

भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. यामध्ये एकूण 5 संशयित असून 2 फरार झाले आहेत. तर 3 संशयितांना ताब्यात घेण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामध्ये कराडातील एकासह दुधोंडीतील दोघांचा समावेश आहे.

ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकाऱ्यांची टोळी जेरबंद
पाटण : अवैध शिकारप्रकरणी वनविभागाने ताब्यात घेतलेले संशयित

ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकाऱ्यांची टोळी जेरबंद

 

वनविभागाची धडक कारवाई : कराडातील एकासह दुधोंडीतील दोघे ताब्यात; तर दोघे फरार 

 

कराड/प्रतिनिधी : 

          भोसगाव ता. पाटण येथील ढेबेवाडी वनक्षेत्रात शिकारीसाठी आलेल्या टोळीला वनविभागाच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. सदर कारवाईत वनविभागाने संशयितांकडून ६ जिवंत हातबॉम्ब, २ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. शनिवारी ३० रोजी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. 

        अजय पोपट कोळी रा. भेद चौक कराड, उमेश नेताजी मदने व महेश भीमराव मंडले दोघेही रा. दुधोंडी ता. पलूस जि. सांगली अशी वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयित शिकाऱ्यांची नावे आहेत.

        दरम्यान, या प्रकरणात एकूण ५ सशयितांचा समावेश असून दोन जण पसार झाले आहेत.  सशयितांवर भारतीय वन्यजीव अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

        तसेच आज रविवारी ३१ रोजी सकाळी सदर परिसरात २ रानडुक्करे मृतावस्थेत आढळून आली आहेत. त्यामुळे वनविभागाकडून सतर्कता दर्शवत फरारी संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. 

       या कारवाईत उपवनसंरक्षक सातारा एम.एन. मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल पाटण एल.व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल भोसगाव सुभाष राऊत, वनरक्षक घोटील जे. आर. बेंद्रे, वनरक्षक काळगाव व्ही.व्ही. डुबल, वनरक्षक कुंभारगाव एस. एस. पाटील, वनरक्षक सणबूर ए. एस. पन्हाळे, वनरक्षक खळे एस. एस. सुतार, तसेच वनमजूर एस. एस. मुल्ला, आर.पी. सातपुते आदींचा समावेश होता.