डॉक्टर हा सेवाभावी कार्यकर्त्याच - श्रीनिवास पाटील

डॉक्टर हा सेवाभावी कार्यकर्त्याच - श्रीनिवास पाटील

कराड/प्रतिनिधी : 

                         हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना अनेक शारीरिक, मानसिक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांमुळे रुग्णांचा एकप्रकारे पुनर्जन्मच होत अडल्याने तो प्रत्येक रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी दैवतच आहे. परंतु, तो ही एक माणूस आहे. हल्ली काही घटनांमध्ये रुग्णांच्या नातेवाइकांनी डॉक्‍टरांवर हल्ला केल्याच्या घटना निंदनीय असून डॉक्टर हाही सेवाभावी कार्यकर्त्याच असल्याचे मत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. 

                       आदरणीय पी.डी. पाटील गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हृदयरोग शल्य विशारद डॉ. रणजित जगताप यांचा पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2019 चे पुरस्कार वितरण समारंभ शनिवारी 21 रोजी सायंकाळी येथील सौ. वेणूताई चव्हाण स्मारक येथे संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी हृदयरोग शल्य विशारद डॉ. रणजित जगताप, सौ. मनीषा जगताप, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, प्रकाशबापू पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, पंचायत समितीचे उपसभापती सुहास बोराटे, राष्ट्रवादी काँग्रेस कराड उत्तरेचे अध्यक्ष देवराज पाटील, दिलीपभाऊ चव्हाण, शोभा पाटील,  प्रतिष्ठानचे विश्वस्त अॅड. मानसिंगराव पाटील, जि.प. सदस्य मानसिंगराव जगदाळे, राजेंद्र माने आदी. उपस्थित होते.