बेळगावात घुमला मराठी आवाज

डॉ.विनोद बाबर यांनी मांडली मराठयांची शौर्यगाथा

बेळगावात घुमला मराठी आवाज

कर्नाटक महाराष्ट्र सीमावादाबात सध्या.संवेदनशील परिस्थिती असताना  महाराष्ट्रातील नेत्यांना तसेच वक्त्यांना कर्नाटक बंदी केली आहे परंतु डॉ विनोद बाबर यांनी कर्नाटक राज्यात जाऊन बेळगावात मराठीशाहीचा पानिपतचा गौरवशाली बलिदानाचा इतिहास हजारो माणसांच्या समोर ताकतीने मांडला यामुळे एक नवी उर्मी आणि आशा सीमाभागातील जनतेच्या मनात निर्माण झालीं आहे

 

अटकेपार झेंडा लावणारी मराठ्यांची सोशल मीडियातील पिढी कागल हद्द पार करून पुढे जायला कचरत असताना छत्रपती शिवरायांच्या भूमीतील एक युवक बेळगावात जाऊन मराठी बाण्याची आणि ताठ कण्याची यशोगाथा हजारो जनसुमदाया समोर निधड्या छातीने मांडतो आणि समस्त सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या मातीला हेवा वाटेल असे धारिष्ट्य दाखवतो याबाबत प्रेरणादायी वक्ते  प्रा.डॉ. विनोद बाबर यांचा अभिमान वाटतो सीमावादाच वातावरण अतिशय संवेदनशिल असतानाही  कर्नाटकच्या सीमाभागात जावून   मराठ्यांच्या राष्ट्रप्रेमाचा, शौर्याचा, पराक्रमाचा आणि बलिदानाचा गाथा  सांगणाऱ्या डॉ.विनोद बाबर यांचा मराठी बाण्याचा आवाज  सीमाभागात  घुमला. 

राजकीय झुल घातलेले पांढरपेशी राजकारणी सत्तेची ढाल करून शब्दांचे खेळ करून लोकांना झुलवत ठेवण्याचे महापाप करून घेत आहेत पण या परिस्थितीत सीमाभागातील मराठी बांधवांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम डॉ.विनोद बाबर यांच्या  बेळगाव मच्छे येथील कार्यक्रमा मुळे झाले आहे. 

'जो पर्यत जिंकत नाही तो पर्यंत रणांगण सोडायचे नाही' आणि 'जो पर्यत मरत नाही तो पर्यत हटायच नाही'जगावं कसं आणि मरावं कसं हे मराठ्यांनी संबंध देशाला दाखवून दिले आहे  अशी अंगावर रोमांच उभी करणारी गर्जना हजारो मावळ्यांच्या पुढे निडर पणे मांडताना डॉ विनोद बाबर यांनी बेळगावात मराठी आवाज काय असतो याची चुणूक दाखवली .

पानीपतची तिसरी लढाई जानेवारी१४ १७६१ रोजी भारतातील हरियाणा राज्यातील पानिपत जवळ झाली. याच गावाजवळ पहिली दोन युद्धे झाली होती, ज्यात मुघलांची सरशी झाली होती व भारतात मुघल सत्तेचा पाया घातला गेला होता. तिसरी लढाई अफगाण सेनानी अहमदशाह अब्दाली आणि महाराष्ट्रातील मराठ्यांत झाली. पानिपतचे युद्ध’ म्हणजे मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे इतके की, त्या युद्धाशी संबंधित अनेक गोष्टी गेली कित्येक वर्षं, अगदी आतापर्यंत नकारात्मक दृष्टीने पाहिल्या गेल्या.

पण डॉ.विनोद बाबर यांनी पानिपत हा आमचा पराभव नाही.तर पनिपत  ही आमची शौर्यगाथा आहे. जरी आम्ही लढाई हरलो असलो तरी युध्द मात्र मराठेच जिंकले होते हे ठामपणे यावेळी सांगितले कारण  या देशात अनेक लढवय्या जाती आहेत पण देशाच्या संकट काळात स्वतःच राज्य ओलांडून देशाला वाचविण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही पुढे आले ते फक्त मराठे ,कारण उपाशी पोटी कोणाचेही सहाय्य नसताना . मराठे अन्न-अभावी इतका चिवट प्रतिकार करू शकतात आणि ते हि इतक्या दूर येवून आणि इतक्या हाणी मुळे जास्त दिवस अफगानि फौज (अहमदशहा अब्दाली) या भारतात राहू शकले नाहीत... या मराठ्यांच्या बालिदानामुळेच परकीय आक्रमण खिळखिळे झाले व परकीय सत्ता मागे हटली..पण  पूर्ण तरुण पिढी यासाठी मराठ्यांना गमवावी लागली होती हीच मराठयांची यशोगाथा  डॉ विनोद बाबर यांनी.सीमाभागात ताकदीने मांडली