दुखापतग्रस्त वारकऱ्यांची भिडे गुरुजींनी केली विचारपूस

दुखापतग्रस्त वारकऱ्यांची भिडे गुरुजींनी केली विचारपूस

राड/प्रतिनिधी :

                      संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्यात मंगळवारी 19 रोजी दिवे घाट येथे नियंत्रण सुटल्यामुळे जेसीबी थेट पालखी सोहळ्यात घुसल्याची दुर्घटना घडली होती. यामध्ये महाराजांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांचा आणि  ह. भ.प. अतुल महाराज आळशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर पंधरा वारकरी गंभीर जखमी असून त्यांच्यावर हडपसर (पुणे) येथील नोबेल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील जखमी वारकरी बंधूंची श्री. शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे, गुरुजींनी सोमवारी  रुग्णालयात जाऊन आत्मीयतेने विचारपूस केली.

                           यावेळी श्री. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे धरकार्यांसह संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या दिंडी सोहळ्यातील वारकरी उपस्थित होते. संत श्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यात सामील होण्यासाठी साडेसातशे वर्षापासुन श्री. क्षेत्र पंढरपूर ते श्री. क्षेत्र आळंदी पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते.  मंगळवारी 19 रोजी सकाळी सासवडमधील मुक्काम उरकून सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. दरम्यान, पालखी सोहळा दिवे घाट येथे आला असता नियंत्रण सुटल्यामुळे जेसीबी थेट पालखी सोहळ्यात घुसल्याची घटना घडली. या दुर्दैवी घटनेत संत श्री. नामदेव महाराजांचे सतरावे वंशज ह.भ.प. सोपान महाराज नामदास यांच्यासह ह.भ.प. अतुल महाराज आळशी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण पालखी सोहळा व वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली.

                           तर या दुर्घटनेत इतर पंधरा वारकरी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर हडपसर (पुणे) येथील नोबेल  रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वारकरी संप्रदायावर कोसळलेल्या या दुःखद प्रसंगी संभाजीराव भिडे गुरुजींनी सोमवारी 20 रोजी सकाळी रुग्णालयातील जखमी वारकर्यांची भेट घेऊन आत्मीयतेने वारकरी बंधूंची विचारपूस केली. या प्रसंगी दिंडी सोहळ्यादरम्यान येणाऱ्या समस्यांमध्ये भिडे गुरुजींनी लक्ष घालावे, अशी जखमी वारकऱ्यांनी विनंती केली. या कृतीतून  वारकरी संप्रदायावर कोणतेही संकट आले; तरी श्री. शिवछत्रपतींचे धारकरी कायम आपल्या सोबत असतील, हे भिडे गुरुजींनी  यांनी दाखवून दिले आहे.