DvM Special : भारतासाेबत चर्चेसाठी शिल्लक काहीच नाही : इम्रान खान

इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी काश्मीर मुद्द्यावर भारतावर टीका केली. प्रत्येक मंचावर काश्मीरच्या मुद्द्यावर अपयशी राहिल्यानंतर जगभरातून पाकिस्तानावर तयार हाेत असलेल्या दबावात इम्रान खान यांनी न्यूयाॅर्क टाइम्सला मुलाखत दिली. खान म्हणाले, आता मी भारताशी काेणतीही चर्चा करणार नाही. चर्चेसाठी मी सर्वकाही केलेले आहे. आता मी जेव्हा मागे वळून पाहताे तेव्हा वाटते की, मी शांतता आणि चर्चेचा प्रयत्न करत हाेताे त्या वेळी भारताने त्याकडे तुष्टीकरणाच्या प्रयत्नातून पाहिले. आता चर्चेचा प्रश्नच उद््भवत नाही. इम्रान यांनी ही मुलाखत येथील कार्यालयात दिली. काश्मीरमध्ये वाईट स्थिती असल्याचा दावा करत इम्रान खान म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये एक पूर्ण समाज नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. काश्मीरला पूर्णपणे उर्वरित जगापासून विभक्त केले आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या सुमारे ८० लाख लाेकांचे जीवन धाेक्यात आहे. लाेकांना अंत्यसंस्कारात सहभागी हाेऊ दिले जात नाही, अशी स्थिती आहे. दाेन्ही देशांत शांतता नांदावी यासाठी मी प्रयत्न केला. मात्र, माझ्या प्रयत्नांचा वापर भारताने काही लाेकांना खुश करण्यासाठी केला. त्यामुळे दाेन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांत युद्धाचा धाेका वाढत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींना फॅसिस्ट आणि हिंदुत्ववादी संबाेधत आराेप केला की, ते काश्मीरला हिंदूबहुल भागात रूपांतरित करू इच्छित आहेत. दाेन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने आम्ही काेणत्या स्थितीचा सामना करत आहाेत याकडे जगाने लक्ष द्यावे.दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने ठाेस कारवाई करावी : शृंगलाइम्रान यांनी केलेली टीका अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी फेटाळली आहे. त्यांनी सांगितले की, आमचा अनुभव सांगताे की, आम्ही जेव्हा जेव्हा शांततेसाठी पाऊल टाकले तेव्हा ते वाईट सिद्ध झाले. आम्ही पाकिस्तानशी दहशतवादाविराेधात ठाेस कारवाईची आशा बाळगताे.भारत-पाकमध्ये युद्धाचा धाेका वाढत जाताेयइम्रान म्हणाले की, भारत काश्मिरात नरसंहारसारखे काही करू शकतो. येथे ते पूर्ण वंश नष्ट करण्याचा कट रचत आहेत. अशा स्थितीत भारत आपल्या कारवाईस याेग्य ठरवण्यासाठी एखादे आॅपरेशन चालवू शकतो. अशा स्थितीत दाेन्ही देशांतील धाेका वाढत आहे. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today DvM Special: Nothing to discuss with India: Imran Khan


 DvM Special : भारतासाेबत चर्चेसाठी शिल्लक काहीच नाही : इम्रान खान

इस्लामाबाद -पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बुधवारी काश्मीर मुद्द्यावर भारतावर टीका केली. प्रत्येक मंचावर काश्मीरच्या मुद्द्यावर अपयशी राहिल्यानंतर जगभरातून पाकिस्तानावर तयार हाेत असलेल्या दबावात इम्रान खान यांनी न्यूयाॅर्क टाइम्सला मुलाखत दिली. खान म्हणाले, आता मी भारताशी काेणतीही चर्चा करणार नाही. चर्चेसाठी मी सर्वकाही केलेले आहे. आता मी जेव्हा मागे वळून पाहताे तेव्हा वाटते की, मी शांतता आणि चर्चेचा प्रयत्न करत हाेताे त्या वेळी भारताने त्याकडे तुष्टीकरणाच्या प्रयत्नातून पाहिले. आता चर्चेचा प्रश्नच उद््भवत नाही. इम्रान यांनी ही मुलाखत येथील कार्यालयात दिली. काश्मीरमध्ये वाईट स्थिती असल्याचा दावा करत इम्रान खान म्हणाले, भारत सरकार काश्मीरमध्ये एक पूर्ण समाज नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहेत. काश्मीरला पूर्णपणे उर्वरित जगापासून विभक्त केले आहे. काश्मीरमध्ये राहणाऱ्या सुमारे ८० लाख लाेकांचे जीवन धाेक्यात आहे. लाेकांना अंत्यसंस्कारात सहभागी हाेऊ दिले जात नाही, अशी स्थिती आहे. दाेन्ही देशांत शांतता नांदावी यासाठी मी प्रयत्न केला. मात्र, माझ्या प्रयत्नांचा वापर भारताने काही लाेकांना खुश करण्यासाठी केला. त्यामुळे दाेन्ही अण्वस्त्रसंपन्न देशांत युद्धाचा धाेका वाढत आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदींना फॅसिस्ट आणि हिंदुत्ववादी संबाेधत आराेप केला की, ते काश्मीरला हिंदूबहुल भागात रूपांतरित करू इच्छित आहेत. दाेन्ही देश अण्वस्त्रसंपन्न असल्याने आम्ही काेणत्या स्थितीचा सामना करत आहाेत याकडे जगाने लक्ष द्यावे.


दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने ठाेस कारवाई करावी : शृंगला
इम्रान यांनी केलेली टीका अमेरिकेतील भारतीय राजदूत हर्षवर्धन शृंगला यांनी फेटाळली आहे. त्यांनी सांगितले की, आमचा अनुभव सांगताे की, आम्ही जेव्हा जेव्हा शांततेसाठी पाऊल टाकले तेव्हा ते वाईट सिद्ध झाले. आम्ही पाकिस्तानशी दहशतवादाविराेधात ठाेस कारवाईची आशा बाळगताे.

भारत-पाकमध्ये युद्धाचा धाेका वाढत जाताेय
इम्रान म्हणाले की, भारत काश्मिरात नरसंहारसारखे काही करू शकतो. येथे ते पूर्ण वंश नष्ट करण्याचा कट रचत आहेत. अशा स्थितीत भारत आपल्या कारवाईस याेग्य ठरवण्यासाठी एखादे आॅपरेशन चालवू शकतो. अशा स्थितीत दाेन्ही देशांतील धाेका वाढत आहे.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
DvM Special: Nothing to discuss with India: Imran Khan