DvM Special : मी शूटिंगच्या दिवशी पंतप्रधानांना प्रथमच जंगलात भेटलो तेव्हा राजकारणापासून वेगळे, चंचल मोदी अनुभवले...

लंडनहून दिव्य मराठीसाठीबेयर ग्रिल्स, मॅन वाइल्ड शोचे होस्ट१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडच्या जिम कार्बेट पार्कमध्ये जंगल आणि नदीदरम्यान मी आणि पंतप्रधान मोदी “मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. दाट जंगल, खळाळणारी नदी, वाघ-मगरीसारखे प्राणी... अत्यंत रोमांचक प्रवास होता. आम्हाला शूटिंग सुरू करायची होती, पण पाऊस आणि विजा चमकत होत्या. अगोदर आम्हाला जंगलातून जायचे होते, नंतर नदी ओलांडायची होती. नदीजवळ पोहोचलो तर पाण्याची खोली पाहून सुरक्षा रक्षक घाबरले. मात्र, मोदी अगदी शांत आणि उत्साहात होते. नदी ओलांडण्यासाठी मी बांबू, जाड गवत इत्यादीपासून छोटी नाव तयार केली. ती अगदी छोटी होती आणि पाणी खोल होते. पंतप्रधानांचे एसपीजी घाबरले होते. मात्र, मोदी नावेजवळ पोहोचले तेव्हा अगोदर हसले. म्हणाले, “बेयर, चला निघूयात.’ सुरक्षा रक्षक काही बोलायच्या आत आमची नाव नदीत पुढे निघाली. आम्ही पूर्ण भिजलो होतो. प्रवासाच्या शेवटी पर्यावरणाबाबत प्रार्थना करावी अशी मोदी यांची इच्छा होती. मी भारावून गेलो. प्रवास संपेपर्यंत आम्ही मित्र बनलो होतो. या काळात जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मोदी यांची चंचल आणि विनम्र बाजू मी पाहिली. १२ ऑगस्टला सारे जग हे पाहील. या प्रवासासाठी पीएमओ आणि डिस्कव्हरी सातत्याने संपर्कात होते. त्यांनीच जिम कार्बेट हे स्थळ निवडले. तेथे आवश्यक वस्तू पोहोचवल्या. माझी मोदींशी चित्रीकरणाच्या दिवशी जंगलात भेट झाली होती. हेच या प्रवासाचे सौंदर्य होते. आम्हाला जास्त नियोजन नको होते. काही बाबी आम्ही त्याच जागी ठरवल्या. जंगलातून जात नदी पार करणे आणि परिस्थितीनुसार पुढील टप्पा निश्चित करणे असे नियोजन होते. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन व्हावे हा हेतू होता. पंतप्रधान जंगलात उत्साही तरुणाप्रमाणे राहिले. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today DvM Special: When I first met the Prime Minister in the jungle on the day of the shooting, I felt different from politics, playful Modi ...


 DvM Special : मी शूटिंगच्या दिवशी पंतप्रधानांना प्रथमच जंगलात भेटलो तेव्हा राजकारणापासून वेगळे, चंचल मोदी अनुभवले...

लंडनहून दिव्य मराठीसाठीबेयर ग्रिल्स, मॅन वाइल्ड शोचे होस्ट


१४ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडच्या जिम कार्बेट पार्कमध्ये जंगल आणि नदीदरम्यान मी आणि पंतप्रधान मोदी “मॅन व्हर्सेस वाइल्ड’च्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. दाट जंगल, खळाळणारी नदी, वाघ-मगरीसारखे प्राणी... अत्यंत रोमांचक प्रवास होता. आम्हाला शूटिंग सुरू करायची होती, पण पाऊस आणि विजा चमकत होत्या. अगोदर आम्हाला जंगलातून जायचे होते, नंतर नदी ओलांडायची होती. नदीजवळ पोहोचलो तर पाण्याची खोली पाहून सुरक्षा रक्षक घाबरले. मात्र, मोदी अगदी शांत आणि उत्साहात होते. नदी ओलांडण्यासाठी मी बांबू, जाड गवत इत्यादीपासून छोटी नाव तयार केली. ती अगदी छोटी होती आणि पाणी खोल होते. पंतप्रधानांचे एसपीजी घाबरले होते. मात्र, मोदी नावेजवळ पोहोचले तेव्हा अगोदर हसले. म्हणाले, “बेयर, चला निघूयात.’ सुरक्षा रक्षक काही बोलायच्या आत आमची नाव नदीत पुढे निघाली. आम्ही पूर्ण भिजलो होतो. प्रवासाच्या शेवटी पर्यावरणाबाबत प्रार्थना करावी अशी मोदी यांची इच्छा होती. मी भारावून गेलो. प्रवास संपेपर्यंत आम्ही मित्र बनलो होतो. या काळात जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मोदी यांची चंचल आणि विनम्र बाजू मी पाहिली. १२ ऑगस्टला सारे जग हे पाहील. या प्रवासासाठी पीएमओ आणि डिस्कव्हरी सातत्याने संपर्कात होते. त्यांनीच जिम कार्बेट हे स्थळ निवडले. तेथे आवश्यक वस्तू पोहोचवल्या. माझी मोदींशी चित्रीकरणाच्या दिवशी जंगलात भेट झाली होती. हेच या प्रवासाचे सौंदर्य होते. आम्हाला जास्त नियोजन नको होते. काही बाबी आम्ही त्याच जागी ठरवल्या. जंगलातून जात नदी पार करणे आणि परिस्थितीनुसार पुढील टप्पा निश्चित करणे असे नियोजन होते. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचे दर्शन व्हावे हा हेतू होता. पंतप्रधान जंगलात उत्साही तरुणाप्रमाणे राहिले.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
DvM Special: When I first met the Prime Minister in the jungle on the day of the shooting, I felt different from politics, playful Modi ...