पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना अभिनेता सोनू सूद स्वखर्चाने आपापल्या गावाला पोहोचवत आहे. आतापर्यंत त्याने तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त परप्रांतियांना आपल्या घरी पोहोचवून अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. समाजाला अशा समाजनायकांची खरी गरज आहे. त्यामुळेच सोनू सूद जनतेच्या कौतुकाला पात्र ठरला आहे.

पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन हिरो
अभिनेता सोनू सूद

          कृष्णाकाठ / अशोक सुतार 

            पडद्यावरचा खलनायक ते लॉकडाऊन काळातील नायक सोनु सूदची आज चर्चा होत आहे. सोनू सूद हा तेलुगु, तमिळ, पंजाबी, इंग्लिश, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आहे. सोनू सूदने देशातील स्थलांतरित कामगारांना कोरोनाकाळात त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे, बस आणि विमानांची सोया केली तसेच त्यांना जेवण, निवारा यांची सोय केली आहे. फिल्मसृष्टीतील अभिनेते आज कोरोनाकाळात आपापल्या घरी आहेत. असे असताना काही अभिनेत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील चौथ्या वर्गासाठी म्हणजे असंघटित कामगारांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यामुळे सोनू सूद यांच्याबद्दल गूगलवर तरुणांचा सर्च वाढला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार कोरोना काळात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवून नागरीकांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. असे असतानाच सोनू सूद याने स्थलांतरित कामगारांसाठी दाखवलेली माणुसकी चर्चेचा आणि गौरवाचा विषय ठरली आहे. सोनू सूद यांची प्रेरणा घेऊन सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते समाजासाठी पुढे सरसावले आहेत. अनेक बॉलिवूड स्टार्सनी आर्थिक दान व गरजूंसाठी भोजनाची व्यवस्था केली.सोनू सूदने स्थलांतरीत मजुरांसाठी बस सेवा सुरु केली. आता सोनूपाठोपाठ बॉलिवूडचा ‘सिंघम अजय देवगण धारावीतील ७०० कुटुंबाच्या मदतीसाठी समोर आला आहे. नुकतेच अजय देवगणने सोनू सूदच्या कामाचे कौतुक केले होते.लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना अभिनेता सोनू सूद स्वखर्चाने आपापल्या गावाला पोहोचवत आहे. आतापर्यंत त्याने तब्बल १२ हजारांपेक्षा जास्त परप्रांतियांना आपल्या घरी पोहोचवून अनेक कुटुंबाच्या चेहऱ्यावर हसू आणले आहे. समाजाला अशा समाजनायकांची खरी गरज आहे. त्यामुळेच सोनू सूद जनतेच्या कौतुकाला पात्र ठरला आहे.                                                                                   सोनू सूद हे पंजाबी कुटुंबातील असून महाराष्ट्रातील नागपूर येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. सोनू सूद यांनी जाहिरात क्षेत्रात तसेच त्यांनी विविध भाषेतील चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांनी जपानी चित्रपटातही काम केले आहे. भारतात तीन महिन्यांपूर्वी कोरोनाची महामारी आली आहे. अशावेळी मे २०२० मध्ये, कोविड -१९ सर्व देशभर पसरला आणि देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान सोनू सूदने अडकलेल्या हजारो भारतीय प्रवासी कामगारांना बसची सोय करून संपूर्ण भारतात त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली. १९९९ मध्ये सोनू सूदने तमिळ चित्रपटात काम केले. तेलगू चित्रपटात सोनू सूद हे प्रभावी ठरले. कन्नड चित्रपटातही त्यांनी आपली ओळख निर्माण केली. अभिनेता सोनू सूद लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी देवदूत ठरला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या बारा हजार स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. सोनू चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असला तरी सध्या यामुळे खऱ्या आयुष्यात तो लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य जनतेचा नायक बनला आहे. सोनू सध्या गुगल ट्रेंडमध्ये देखील आघाडीवर आहे.सोनूने दिलेला टोल फ्री नंबर, तो लोकांना करत असलेली मदत अशा विविध गोष्टी लोक सध्या गुगलवर सर्च करत आहेत. सोनू आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणार याची अनेक मजूरांना खात्री असल्याने ते मेसेज करून सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनूकडून मदत मागत आहेत. सोनू सूदसारखे लोक जेव्हा जनतेची कामे करतात, त्यावेळी एकप्रकारे सरकारवरील तणाव कमी होतो. त्यामुळेच असे लॉकडाऊन नायक पुढे येणे गरजेचे आहे.                                                                             कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या संकटाच्या काळात अनेक कोट्याधीशांनी मदत कार्यात भाग घेतला आहे. करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला आहे. अभिनेता सोनू सूदने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी स्वीकारली असून त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे. सोनू सूदची चर्चा फक्त भारतातच होत नसून चीनमध्येही होत आहे. सोनू सूदचा चाहता वर्ग भारताप्रमाणे चीनमध्येही आहे. २०१७ च्या ‘कुंग फू’ योगा या सिनेमात सोनूने अभिनय केला आहे. या सिनेमातील सोनू सूदच्या भूमिकेचे चीन व बाहेरच्या देशांमध्ये विशेष कौतुक झाले होते. प्रवासी मजूरांच्या मदतीनंतर केरळमधील एर्नाकुलम येथे अडकलेल्या १७७ मुलींना स्पेशल विमानाने त्यांच्या घरी सोनू सूद पोहचवणार आहे. त्या मुली केरळमधील एका फॅक्टरीमध्ये शिवणकाम व एम्ब्रॉडरीचे काम करतात. अभिनेता सोनू सूद याने भुकेल्या, खचलेल्या आणि आपल्या गावी जाण्यास अगतिक असलेल्या हजारो मजूरांना त्याने मदतीचा हात दिला. शेकडो किमीची पायपीट करत घरी निघालेल्या स्थलांतरीत मजूरांसाठी सोनूने बसेसची व्यवस्था केली. मदत मागणाऱ्या प्रत्येकासाठी सोनू रात्रंदिवस मेहनत घेत आहे.                 पडद्यावर सोनूने खलनायकाच्या भूमिका रंगवल्या पण या कामामुळे सोनू सूद सगळ्यांचा हिरो झाला आहे. शेवटच्या प्रवासी, मजूरापर्यंत आम्ही हे काम सुरुच ठेवणार असल्याचे सोनुने म्हटले आहे. मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेश , बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीने सोनू सूदकडून स्थलांतरीत नागरिकांना घरपोच करण्यात येत आहे. त्यासाठी, आता सोनू सूदने एक टोल फ्री क्रमांक 18001213711 जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना त्यांच्या घरी रवाना केले. बिहारमधील काही युवकांनी सोनू सूदचा पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, ते पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरा असे उत्तर सोनूने दिले आहे. सोनूला घरी जाण्यासाठी कामगारांचे रोज शेकडो कॉल व मॅसेज येत आहेत. तो एकटा हे सर्व सांभाळू शकत नसल्याने त्याने एक टीम तयार केली आहे. एका इंग्रजी वृत्तानुसार, सोनू एकूण १३०.३३९कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. सोनू मुंबईमध्ये राहतो. सोनुने हेल्पलाईन नंबर दिला असला तरी सर्वाना तो उत्तर देऊ शकत नाही, याबद्दल मजूर आणि प्रवाशांची त्याने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. सोनू सूद म्हणतो, सध्या माणुसकी कमी झाली आहे. आपण घरी बसलो आहोत आणि ज्यांनी आपली घरं बनवली ते रस्त्यावर आहेत. या लोकांना मदत करणे माझे कर्तव्य आहे. सोनुने वडिलांच्या नावाने सुरु असलेल्या अन्नछत्रात आजही सुमारे पन्नास हजार लोकांच्या जेवणाची सोय केली जाते. पायपीट करणाऱ्या मजुरांना पोरांबाळांसह पाहिल्यानंतर, त्यांच्या अडचणी समजल्यानंतर मी पुढे येण्याचा निर्णय घेतला,अशी भावना सोनू व्यक्त करतात.