गोटेवाडीचा बंधारा वाहून गेला

गोटेवाडी ता.कराड येथे बांधकाम सुरू असलेल्या धरणाच्या नाल्याचा भराव वाहून गेल्याने धरणावरील आढ्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. दक्षिण मांड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गाटेवाडी, गणेशवाडीसह येळगाव परिसरात धरण फुटल्याच्या अफवेने घबराट पसरली. यामध्ये ओढ्याखालच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतीचे मोेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धरण सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. 

गोटेवाडीचा बंधारा वाहून गेला
गोटेवाडी बंधाऱ्याची पाहणी करताना माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण
गोटेवाडीचा बंधारा वाहून गेला


कराड/ प्रतिनिधी
गोटेवाडी ता.कराड येथे बांधकाम सुरू असलेल्या धरणाच्या नाल्याचा भराव वाहून गेल्याने धरणावरील आढ्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाली. दक्षिण मांड नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गाटेवाडी, गणेशवाडीसह येळगाव परिसरात धरण फुटल्याच्या अफवेने घबराट पसरली. यामध्ये ओढ्याखालच्या शेतामध्ये पाणी शिरून शेतीचे मोेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. धरण सुरक्षित असून कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नाही. 
याबाबत अधिक माहिती अशी की, गोटेवाडी नजीक बांदे नावाच्या शिवारात गेल्या चार-पाच वर्षापासून  धरणाचे काम सुरू आहे. धरणाचे सत्तर टक्के काम पर्ण झाले असून . धरणाच्या जलाशयात दोन विद्युत टॉवर येत असल्याने धरणाचे उत्तरेकडील भितींचे काम अपूर्ण आहे. त्याबाजूनेच धरणात पाणी साठा करणारा नाला जातो या नाल्यापासून उत्तरेला चार -पाच मीटरवर धरणाचा नियोजित सांडवा आहे. उन्हाळ्यात धरणाचे काम सुरू असताना धरणाच्या कामामध्ये डंपर, ट्रक्टर वगैरे वाहने ये-जा करण्याकरता त्या नाल्यामध्ये भराव टाकला होता. त्यावरुन वाहनांची ये-जा सुरू होती. सध्या पाऊस सुरू असल्याने काम बंद आहे. मात्र सध्या धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून वाहनांच्या रस्त्यासाठी नाला भरल्यामुळे नाला तुंबुन धरणात पाणी साठले. त्या पाण्याच्या दाबाने नाल्यातील भराव वाहून गेल्याने धरणात साठलेले पाणी वेगाने ओढ्याच्या पात्रात घुसले. त्यामुळे ओढ्याच्या काठावर असलेल्या शेतात पाणी घुसून शेते पीकासह वाहून गेली. यामध्ये विकास केसरे, राधा केसरे, अनुसया कळंत्रे यांच्या ऊसाच्या क्षेत्राचे नुकसान झाले. गंगूबाई कळंत्रे, हणमंत कळंत्रे, बापूराव कळंत्रे, शंकर केसरे, विष्णू काटेकर यांच्या पीकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान काही जागरूत ग्रामस्थांनी घटनेचे गांभीर्य ओळखून ओठयाकाठील असणार्‍या गणेशवाडी, येळगाव येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांना फोनवरून सावध  राहण्याच्या सुचना दिल्या. त्यामुळे मोठी जिवीत हानी टळली. मात्र, ओढ्याला आलेल्या मोठ्या पाण्याने बंदारा फुटल्याची अफवा परिसरात पोहोचली. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी धरणाकडे धाव घेतली. या पाण्यामुळेे येळगाव, गोटेवाडी रस्त्यावर शेडगे पेपर मीलजवळील पूलावर पाणी आल्याने हा रस्ता काही वेळ पाण्याखाली गेला. 
दरम्यान येळगाव जिल्हापरिषद गटाचे सदस्य व युवा नेते अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून परस्थितीची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी खराडे, तहसिलदार वाकडे, विजय माने, डी.वाय.एस.पी. नवनाथ ढवळे, तलाठी ,सरपंच यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर माजी मुुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ.आनंदराव पाटील यांनी भेट दिली.