राज्यांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

राज्य निवडणूक आयोगाने जारी केला 'तो' आदेश

राज्यांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

 

राज्यांत उडणार ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा

राज्य निवडणूक आयोगाने जारी केला 'तो' आदेश

 

विशेष प्रथिनिधी

 

जुलै ते डिसेंबर २० अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या ग्रामपंचायतींवर प्रशासकही नेमण्यात आले आहेत. त्यातच आज राज्य निवडणूक आयोगाने एक आदेश जारी केला आहे. राज्य निवडणूक विभागाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी याबाबत जिल्हाधिकार्यांना सूचना केल्या आहेत.

 

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षण सोडतिचा अहवाल उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून जिल्हाधिकार्यांनी अंतिम मंजुरी देण्यात यावी. याप्रक्रीयेसाठी २७ ऑक्टोंबर ही मुदत जाहीर करण्यात आली आहे. तर जिल्हाधिकारी यांनी त्यास २ नोव्हेंबर रोजी नमुना 'अ' मध्ये व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.त्यांनतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या दरम्यान ग्रामपंचायत निवडणुका पार पडतील.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेला या आदेशाने राज्यभर गावपुढार्यांच्या आनंदाला उधाण आले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, आणि भाजप या प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी अधिकाधिक ठिकाणी सत्ता हस्तगत करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या वरिष्ठांनी त्या-त्या मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधींवर जबाबदारी सोपविली असल्याने त्यांनीही कंबर कसली आहे.