सदगुरु हणमंत बुआ रामदासी महाराज यांचे  निधन

 सदगुरु हणमंत बुआ रामदासी महाराज यांचे  निधन
फोटो ।प. पू. सदगुरु हणमंत बुआकडेगाव :प्रतिनिधी

         मोहिते वडगाव ता. कडेगाव येथील जागृत देवस्थांन श्री लिंगेश्वर मंदिर येथील प. पू. सदगुरु हणमंत बुआ रामदासी महाराज यांनी शनिवारी दुपारी २-४० वाजता श्री लिंगेश्वर गोशाळा मो. वडगाव येथे देह ठेवला होता. महाराजांचे वय ७० वर्षे होते. त्यांचे भक्तगण सर्व महाराष्टभर आहेत.प.पू. हणमंत बुवा रामदासी यांचे महाराष्टभर मोठ्या प्रमाणात शिष्य आहेत. त्यांनी देह ठेवल्याची माहिती पसरताच परिसरात शोककळा पसरली होती.
         प. पू. सदगुरु लिंगेश्वर महाराज आळसंद येथे गेल्यानंतर त्यांचे जवळचे शिष्य प.पू.सदगुरु हणमंत बुआ रामदासी महाराज हे लिंगेश्वर देवस्थानची धुरा सांभाळत होते. मागील ५० वर्षापासून लिंगेश्वर येथे देव, देश व धर्मासाठी ते अहोरात्र काम करीत होते. त्यांनी १९९४ साली मोहित वडगाव येथे श्री लिंगेश्वर गोशाळा व प. पु. सदगुरु हणमंत महाराज चारिटेबल टृष्ट ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातुन त्यांनी समाज उपयोगी कामे केली. 
       आपले अखंड आयुष्य त्यांनी लिंगेश्वर देवस्थानची सेवा केली. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच लिंगेश्वर मंदिर परिसराचा विकास झाला.त्यामुळं राज्यभरातून भक्तगण लिंगेश्वर मंदिरात श्री चरणी येऊन नतमस्तक होत आहेत. राज्यभर फिरून दान दक्षिणा गोळा करून त्यांनी लिंगेश्वर मंदिर परिसराची विकासकामे केली व गोशाळा उभारली..
        सागरेश्वर अभयारण्य स्थापन झाल्यानंतर लिंगेश्वर मंदिर अभयारण्याच्या हद्दीत गेल्याने भक्तगणांना त्रास सहन करावा लागू नये यासाठी मंदिर परिसर अभयारण्याच्या हद्दीतून वगळावा यासाठी त्यांनी लढा उभारला. प्रसंगी तुरुंगाची,कोर्टाची पायरी चढायची तयारी दर्शवली. पण त्यात त्यांना यश आले नाही हे दुर्दैव..तरीही त्यांनी लिंगेश्वराची पूजाअर्चा नित्यनेमाने केली.. एकेकाळी त्यांच्या माध्यमातून "श्री राम..जय राम.. जय जय राम"च्या जयघोषाने दुमदुमणार्या  लिंग दरीत आज शुकशुकाट पाहायला मिळतो.
        पंढरपूर, सांगली, सातारा , कोल्हापुर सह पुर्ण महाराष्टातून दर्शनासाठी लोक आले होते. देहदर्शन सोहळा रविवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत होता. त्यानंतर समाधी सोहळा प पू सदगुरु हणमंत महाराज चारिटेबल टृष्ट मोहिते वडगाव येथे पुर्ण झाला.