हसन मुश्रीफांचा आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा -किरीट सोमय्या

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. उद्या या घोटाळ्याचे पुरावे ईडीसह आयकर विभागाला देणार असून लवकरच त्यांचा तिसरा घोटाळाही उघडकीस आणणार आहे.

हसन मुश्रीफांचा आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा -किरीट सोमय्या

हसन मुश्रीफांचा आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात 100 कोटींचा घोटाळा

किरीट सोमय्या : मला अडवून ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश : मुश्रीफांचे कार्यकर्ते गुंड आहेत का? 

कराड/प्रतिनिधी : 

           कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात हसन मुश्रीफ यांनी 100 कोटींचा घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात ईडीने कारवाई सुरू केल्याने माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. मात्र, असल्या कारवायांना मी भीत नाही. उद्या हसन मुश्रीफ यांच्या घोटाळ्याचे पुरावे ईडीसह आयकर विभागाला देणार असून लवकरच त्यांचा तिसरा घोटाळाही उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजपचे आमदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. 

            महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरकडे जात असताना कराड रेल्वे स्थानकावर कराड पोलिसांनी सोमवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस बंदोबस्तात येथील शासकीय विश्रामगृह येथे आणण्यात आले. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

           आ. किरीट सोमय्या म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मी केलेल्या आरोपांची  चौकशी सुरू झाली आहे. मुश्रीफ परिवारातील सदस्यांच्या नावे फक्त २ कोटी रूपये आहेत. मग, त्यांच्या  कंपनीत १२७ कोटी रुपये कसे आले, याचे उत्तर त्यांनी दिलेले नाही. असा सवाल उपस्थित करून बाकीचा पैसा घोटाळ्याचे आहेत. तसेच गडहिंग्लजच्या आप्पासाहेब नलावडे कारखान्यात त्यांनी १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा  आरोपही त्यांनी यावेळी केला. 

          ते पुढे म्हणाले, मी केलेल्या आरोपांमुळे ईडीने त्यांच्याविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे माझ्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून मी असल्या कारवायांना भीत नाही. याप्रकरणीची कागदपत्रे मी उद्या ईडीकडे देणार आहे. २०२० मध्ये कोणतेही व्यवहार न होता हा कारखाना ब्रिक्स इंडियाला देण्यात आला आहे. कोणताही अनुभव नसताना हा कारखाना त्यांना चालवायला देण्यात आला. याचे कारण मुश्रीफ यांचे जावई या कंपनीत असल्याचा गौप्यस्फोटही  सोमय्या यांनी यावेळी केला आहे. 

          दरम्यान, मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी मला गैरकायदेशीर अडवून ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. ना. मुश्रीफ यांचे कोल्हापूर येथे आज आगमन होणार आहे. ते दवाखान्यात होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले आहेत. त्यात किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा झाला तर दौऱ्यात गनिमी काव्याने हल्ला होऊ शकतो, असे लेखी पत्र मला दिले. माझ्यावर हल्ला कोण करणार? हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करणार होते. ते कोण गुंड आहेत का? असा संतप्त सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला.