इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात महिलेने स्वतःला घेतले पेटवून....!!

इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात महिलेने स्वतःला घेतले पेटवून....!!

इंदापूर पोलीस स्टेशनच्या आवारात महिलेने स्वतःला घेतले पेटवून....!!

७० टक्के महिला जखमी..!!

जितेंद्र जाधव
इंदापूर/ प्रतिनिधी:-

इंदापूर शहरांमध्ये आज मोठी घटना घडली आहे. इंदापूर पोलीस स्टेशन च्या परिसरात एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले आहे. पेटवून घेतलेल्या महिलेला जखमी अवस्थेत इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्या असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत.

सदरची महिला इंदापूर तालुक्यातील कळाशी या गावची असून तिचे नाव तेजस्विनी सूर्यवंशी असे आहे. नेमके पेटवून घेण्याचे कारण स्पष्ट झाले नसले तरी नेमका हा प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडलाच कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेत सदरची महिला ७० टक्के पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाची जखमी असून तिच्यावरती इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचार चालू आहेत.