जनकल्याण’ची सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी - नितीन गडकरी

सहकार क्षेत्रात समर्पित भावनाने काम करणे गरजेचे आहे. ते जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे या संस्थेला मिळालेले यश आनंददायी असून सहकार क्षेत्रात जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेची कामगिरी अत्यंत उत्कृष्ट आहे.

जनकल्याण’ची सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी - नितीन गडकरी
कराड : एहसासचे अधीक्षक संजय कांबळे यांना जनकल्याण गौरव पुरस्कार प्रदान करताना ना. नितीन गडकरी, समवेत चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर देशपांडे, डॉ. मिलींद पेंढारकर व इतर मान्यवर.

जनकल्याण’ची सहकार क्षेत्रात अत्यंत चांगली कामगिरी 

 

नितीन गडकरी : सहकार हा पैसा कमविण्याचा धंदा नाही, सहकार चळवळ निकोप बनवण्यासाठी दृष्टिकोन बदलायला हवा

 

कराड/प्रतिनिधी :            

 

      सहकार क्षेत्रात सर्व चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन निस्वार्थी भावाने काम केल्यास उदिष्ट्पुर्ती होते. त्यासाठी समर्पित भावनाने काम करणे गरजेचे असून ते  जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, पदाधिकारी करीत आहेत. त्यामुळे संस्थेला या मिळाले असून ते आनंददायी आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी अत्यंत चांगले काम केले आहे. एहसाससारख्या निश्वार्थीपणे काम करणाऱ्या संस्थेची पुरस्कारासाठी निवड करून संस्थेने जनसेवेप्रतीची जाणीव दाखवून दिल्याचे गौरोवोद्गार केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी काढले.

 

     येथील हॉटेल पंकज येथे आज शनिवारी २५ रोजी जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा द्वितीय 'जनकल्याण गौरव पुरस्कार' केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एहसास मतीमंद मुलांचे वसतिगृह, वळसे जि. सातारा या संस्थेस प्रदान करण्यात आला. एक लाख रुपयांचा धनादेश, शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. एहसासचे अधीक्षक संजय कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी मंत्री गडकरी बोलत होते.

 

     यावेळी जनकल्याण पतसंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अनिरुध्द देशपांडे, संस्थेचे संचालक सीए. शिरीष गोडबोले, डॉ. अविनाश गरगटे, डॉ. प्रकाश सप्रे, एहसासचे अधीक्षक संजय कांबळे, निवड समितीचे सदस्य रवींद्र कर्वे, प्रमोद कुलकर्णी, गोविंद मोकाशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.