जनसामान्यांना विनामूल्य कोरोना सेंटर आधार देईल - विक्रम पावसकर

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता त्यामानाने लोकांना बेड व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत असून अनेक ठिकाणी त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. परंतु, टिळक हायस्कूलमधील विनामूल्य कोरोना केअर सेंटर जनसामान्यांना नक्कीच आधार देईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला. 

जनसामान्यांना विनामूल्य कोरोना सेंटर आधार देईल - विक्रम पावसकर
टिळक हायस्कूलमध्ये कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले व मान्यवर

कराड/प्रतिनिधी : 

          जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता त्यामानाने लोकांना बेड व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध होत नाहीत. बेडअभावी रुग्णांसह नातेवाईकांचे हाल होत असून अनेक ठिकाणी त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागत आहे. परंतु, टिळक हायस्कूलमधील विनामूल्य कोरोना केअर सेंटर जनसामान्यांना नक्कीच आधार देईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केला. 
           येथील टिळक हायस्कूलमध्ये विक्रम पावसकर मित्र परिवारातर्फे भाजपच्या सहकार्यातून विनामूल्य कोरोना केअर सेंटर उभारण्यात आले आहे.  शनिवारी 12 रोजी दुपारी एक वाजता या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, हिंदू एकता आंदोलनचे प्रांतीय अध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकुंद चारेगावकर, नगरसेवक सुहास जगताप, श्री पेंढारकर, उपस्थित होते.